ग्लोबल

Sajeed Mir: चीनच्या 'व्हेटो'ने मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला वाचवले; 26/11 हल्ल्यात होता सहभाग

अमेरिकेने त्याच्यावर 5 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस निश्चित केले आहे. या महिन्यात पाकिस्तानने त्याला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Ashutosh Masgaunde

UN मध्ये चीनने भारताला पुन्हा एकदा दणका दिला आहे. २६/११ चा दहशतवादी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे भारताचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

अमेरिकेने हा प्रस्ताव यूएनमध्ये आणला होता. यावर भारताने पाठिंबा दिला. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या 1267 अल कायदा विभाग समितीच्या अंतर्गत मांडण्यात आला होता. मात्र, चीनने तो फेटाळला.

हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर साजिद मीरची संपत्ती जप्त केली गेली असती. त्यासाठी त्याला मुक्तपणे फिरण्यास बंदी घालण्यात आली असती. विशेष म्हणजे लष्कर-ए-तैयबाच्या साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने UN मध्ये दुसऱ्यांदा रोखला आहे.

चीनने या प्रस्तावावर व्हेटो केला आहे. मीरची गणना भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांमध्ये केली जाते. तो 26/11 च्या हल्ल्यातीलही आरोपी आहे. अमेरिकन सरकारने त्याच्यावर 5 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस निश्चित केले आहे. या महिन्यात पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने साजिद मीरला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने यापूर्वीच केला आहे. पण त्याच्या बोलण्यावर पाश्चिमात्य देश विश्वास ठेवत नाहीत. त्यांनी पाकिस्तानला याचा पुरावा देण्यास सांगितले. या प्रकरणामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची कसरत करत होता.

साजिद मीर लष्कर-ए-तैयबासाठी दहशतवाद्यांना तयार करतो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तो हल्ल्यांचा ऑपरेटिव्ह मॅनेजर आहे. नियोजनासोबत सर्व प्रकारची तयारीही तो करतो. दरवेळी प्रमाणेच या प्रकरणात चीन आपला खरा मित्र पाकिस्तानला साथ देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT