Xi Jinping & Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

America China Tension: अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा तणाव; चिनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा ड्रॅगनचा आरोप

America China Tension: अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक स्तरावरील संघर्ष कोणापासून लपून राहिलेला नाही.

Manish Jadhav

America China Tension: अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक स्तरावरील संघर्ष कोणापासून लपून राहिलेला नाही. दोन्ही देश जशी संधी मिळेल तशी एकमेकांची गय करत नाहीत. हा झाला आर्थिक आघाडीवरील संघर्ष. राजकीय स्तरावरही दोन्ही देशांदरम्यान काही नवे नाही. राजकीय स्तरावरही दोन्ही देश वेळोवेळी आपली ताकद दाखवतात. दोन्ही देशांचे राजकीय प्रतिनिधी एकमेकांविषयी वक्तव्ये करुन राळ उडवून देतात. यातच आता, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले वाढले असतानाच चीन विद्यार्थ्यांना निशाणा बनवलं जात असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अमेरिका आपल्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने देशातून बाहेर काढत असल्याचा आरोप चीनने केला आहे.

बीजिंगने सोमवारी सांगितले की, अमेरिका कोणत्याही वैध पुराव्याशिवाय चिनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने हद्दपार करत आहे. दरम्यान, चीनने आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यकती सर्व पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी राजधानी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'अमेरिका राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर अतिशयोक्ती करत आहे. तसेच, वैध पुराव्याशिवाय चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा मनमानीपणे रद्द करण्यात आले. त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आणि जबरदस्तीने हद्दपार करण्यात आले.'

दरम्यान, माओ निंग यांना विचारण्यात आले की वॉशिंग्टन ड्युल्स विमानतळ आणि डॅलस विमानतळावर अमेरिकन सीमेत प्रवेश केल्यावर चिनी विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने हद्दपार करण्यात आले. माओ म्हणाले की, 'अमेरिकेच्या या पाऊलामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना आणखी एक धक्का बसला आहे.' माओ पुढे म्हणाले की, ''अलीकडील प्रकरणे दर्शवतात की अमेरिकन अधिकारी चिनी नागरिकांना निर्वासित करण्यासाठी अवाजवी युक्तिवाद करत आहेत. हे स्पष्टपणे भेदभावपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल आहे.''

'चीन आपल्या हिताच्या रक्षणासाठी महत्त्वाची पावले उचलणार'

चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चीन आपल्या नागरिकांच्या कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलेल. अमेरिकेने हा प्रकार ताबडतोब थांबवावा. त्याचवेळी, अमेरिकेतील चीनचे राजदूत शी फेंग यांनीही याप्रकरणी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत येणाऱ्या चिनी नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. ते पुढे म्हणाले की, 'आमच्या विद्यार्थ्यांकडे वैध व्हिसा होता. तसेच, त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. असे असतानाही त्यांची विमानतळावर अधिकाऱ्यांनी 8 तास चौकशी केली. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यापासूनही रोखण्यात आले. त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देशातून हाकलण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT