Chandrayaan-3 to Land on Moon  ISRO
ग्लोबल

Chandrayaan 3 Moon Landing: नासाच्या वैज्ञानिकाचा 'चांद्रयान 3' बद्दल मोठा दावा

Chandrayaan 3 Moon Landing: चांद्रयानाकडून चंद्रावरची इतकी माहीती मिळणे हेच मोठे यश असणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Chandrayaan 3 Moon Landing: चंद्रावर मानवी वसाहती वसवू शकतो का? पृथ्वीप्रमाणेच चंद्रावर माणूस जगू शकतो का? असा अनेकांना प्रश्न पडताना दिसतो. किंबहुना आंतराळ मोहीमा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच आखल्या जातात. आता नासाचे वैज्ञानिक माइक गोल्ड यांनी भारताचे चांद्रयान 3 चंद्रावर मानवी वसाहती वसवण्यात मोठी भूमिका निभावणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

मायकल गोल्ड म्हणतात, चांद्रयान ३ चंद्रावरील महत्वपूर्ण माहीती गोळा करेल ज्याच्या चंद्राचा अभ्यास कऱण्यासाठी मोठा फायदा होईल. चंद्राच्या वातावरणाचा भविष्यात अभ्यास करण्यासाठी संपूर्ण जगाला त्याचा मोठा फायदा होईल. ही मोहीम यशस्वी होऊ किंवा नाही मात्र चांद्रयानाकडून चंद्रावरची इतकी माहीती मिळणे हेच मोठे यश असणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. या भागात या आधी कधीही कोणत्याही देशाने पाऊल ठेवले नाही. दरम्यान, रशियाने देखील लूना 25 हे आंतराळयान पाठवले होते. मात्र चंद्राच्या कक्षेत गेल्यावर त्याच्या ऑटोमॅटिक यंत्रात बिघाड झाला आणि हे यान भरकटले, कमांड अॅक्सेप्ट करु न शकल्यानं हे यान क्रॅश झाले आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष चंद्रयानाकडे लागले आहे.

आज भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. भारताचे महत्वाकांक्षी चांद्रयान 3 आज चंद्रावर उतरणार आहे. आजपर्यंत जगातले 3 देशांनी चंद्रावर यशस्वी लँडिग करत विक्रम केला आहे. सोव्हिएत युनियन, युएसए आणि चीन ( China ) हे तीन देशांनी चंद्रावर आपली मोहीम यशस्वी केली आहे. आज भारताचे चांद्रयान 3 दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले तर हा विक्रम ठरणार आहे. ही मोहीम यशस्वी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT