Kabul Airport Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांचा आकडा नाही: केंद्र सरकार

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अफगाणिस्तानातून (Afghanistan) 550 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, मात्र आता तिथे किती लोक आहेत या बद्दल माहिती नाही.

दैनिक गोमन्तक

युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांची नेमकी संख्या माहित नाही अशी माहिती आज केंद्र सरकारने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा असा विश्वास आहे की बहुतेक भारतीयांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र काही काही अजूनही तेथेच अडकलेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे ,की लोक संपर्क साधत असताना संख्या बदलत राहतात. आम्हाला विश्वास आहे की ज्यांना परत यायचे होते ते बहुतेक लोक मायदेशी परत आले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अफगाणिस्तानातून 550 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये 260 भारतीय आहेत आणि बाकीचे अफगाण आणि इतर देशांचे नागरिक आहेत. या सर्व प्रक्रीयेदरम्यान अमेरिकेशी खूप जवळचा समन्वय होता. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अजूनही अस्थिर आहे. आमची पहिली प्राथमिकता म्हणजे लोकांना बाहेर काढणे. तरी आम्ही परिस्थितीवर तिथल्या लक्ष ठेवून आहोत. त्यानुसार योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, "आम्ही काही अफगाणी नागरिक तसेच इतर देशांचे नागरिक बाहेर काढण्यात यशस्वी झालो आहोत. त्यापैकी बरेच जण शीख आणि हिंदू होते. आमचे लक्ष प्रामुख्याने भारतीय नागरिकांवर असेल, परंतु आम्ही त्या अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहू, जे आमच्या सोबत उभे राहिले. "

बागची म्हणाले, "शेवटच्या फ्लाइटमध्ये 40 लोक होते. अफगाण नागरिकांना विमानतळावर पोहोचण्यात अडचणी येत असल्याच्या बातम्या आम्हाला मिळत होत्या. आम्हाला माहिती आहे की, अफगाणी शीख आणि हिंदूंसह काही अफगाणी नागरिकांना 25 ऑगस्टला विमानतळावर येण्यास अडचणी आल्या. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशिवाय उड्डाण करावे लागले लागले."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT