Romania Dainik Gomantak
ग्लोबल

रोमानियात रशियन दूतावासाच्या गेटला कारची धडक, भीषण आगीत चालकाचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

रोमानियाची राजधानी असणाऱ्या बुखारेस्टमध्ये रशियन दूतावासाच्या (Russian Embassy) गेटवर कार आदळल्याने आग लागली, ज्यामध्ये एका चालकाचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'कार सकाळी 6 वाजता गेटला धडकली, परंतु ती दूतावासाच्या आवारात जाऊ शकली नाही.' या घटनेशी संबंधित व्हिडिओमध्ये, कारमधून आगीच्या ज्वाला निघाल्या. (Car accident at the Russian embassy) त्यानंतर सुरक्षा दलांनी युध्दपातळीवर ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. (Car crashes into Russian embassy gate in Romania, driver killed in fire)

पोलिसांनी सांगितले की, ''अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.'' रशियन दूतावासाने असोसिएटेड प्रेसला फोनवरुन माहिती दिली की, ''आम्ही या घटनेबद्दल अधिक तपशील देऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे, रोमानियाची सीमा युक्रेनला लागून असून रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यापासून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी रोमानियामध्ये (Romania) आश्रय घेतला आहे.''

दहा राजनयिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली

रोमानियाने मंगळवारी दहा रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. रोमानियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलयं की, ''दूतावासातील दहा कर्मचार्‍यांना निष्कासीत करण्याची घोषणा केली होती. त्यांनी 1961 च्या राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या तरतुदींचे उल्लंघन करत होते". 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर पहिला हल्ला केला होता. तेव्हापासून या दोन देशांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे.

युक्रेनमध्ये रशियाने केला

रशियाने युक्रेनमधील बहुतांश शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजधावी कीव जवळील बुचा हे गाव जगभर चर्चेत आहे. युक्रेनच्या अधिकार्‍यांचा आरोप आहे की, रशियन सैन्याने इथे त्यांच्या ताब्यादरम्यान 300 हून अधिक युक्रेनियन नागरिकांना क्रूरपणे ठार मारले आहे. हा सामूहिक नरसंहार आहे. रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर जेव्हा युक्रेनचे सैनिक गावात आले तेव्हा त्यांना रस्त्यावर सर्वत्र लोकांचे मृतदेह पडलेले दिसले. यासोबतच अनेक ठिकाणी घाईघाईने खोदलेल्या कबरींमध्ये मृतदेह उघड्यावर पडले होते. अनेक मृतदेहांचे हात-पाय दोरीने बांधलेले आढळले. ज्यावरुन असे दिसून येते की, लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT