Throuple Relationship, Gay Couple: समलिंगी जोडप्यांचे हक्क आणि नातेसंबंध यावर जगभर खूप चर्चा होत आहे. मात्र हा खूप जुना ट्रेंड आहे, पण तुम्ही कधी ट्रिपल रिलेशनशिपबद्दल ऐकले आहे का? खरेतर ही एक अशी 'जोडी' आहे, ज्याबद्दल ऐकून तुमचंही मन सुन्न होईल.
कारण इथे फरक विचाराचा आहे. ज्या मानसिकतेतून आजपर्यंत आपली करोडो जनता बाहेर पडू शकली. हा खुलासा तुम्हाला आश्चर्यचकित करेल की, असे पण नाते असू शकते का, ज्यामध्ये दोन नव्हे तर तीन लोकांमध्ये प्रेमसंबंध असेल.
'डेलीमेल'च्या वृत्तानुसार, तीन कॅनेडियन मुलांमध्ये असेच नाते आहे, ज्यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे चर्चा केली आहे.
तिघांनाही एकमेकांशी लग्न करायचे आहे. येथे आपण अॅडम जोशुआ, 27, जेके टेलर, 24, आणि डेरिक केनेडी, 30 बद्दल बोलत आहोत, जे एकमेकांच्या प्रेमात वेडे आहेत.
त्यांचे प्रेमसंबंध इतके फुलले आहे की, आता ते एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी एकत्र राहण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, जरी या प्रेमात आणि लग्नाच्या इच्छेमध्ये मोठ्या समस्या आहेत, कारण सध्या हे लग्न कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे.
जोशुआने सांगितले की, कॅनडा विद्यापीठात शिकत असताना 2016 मध्ये जेव्हा तो जेकेला भेटला तेव्हा त्याने त्याला डेट करायला सुरुवात केली.
पाच वर्षांनंतर त्याच्या आयुष्यात असा ट्विस्ट आला की, 2021 मध्ये डेरिकही या प्रेमसंबंधात सामील झाला. डेरिक व्हँकुव्हरमधील पोलिस (Police) विभागात आहे, त्याला कायदा माहित आहे, तरीही तो तिहेरी संबंधात आहे.
आता डेरिक, जेके आणि जोशुआ प्रेमसंबंधात आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये या तिघांनी त्यांचे अनोखे नाते सार्वजनिक केले. तेव्हापासून हे तिघे अनेकदा सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.