Canada Airport Gold Robbery Dainik Gomantak
ग्लोबल

Canada Airport: कॅनडाच्या विमानतळावर 121 कोटींचे सोने चोरी; चोरट्यांनी कंटेनरच पळवला

यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canada Airport Gold Robbery: कॅनडाच्या सर्वात मोठ्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर 17 एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर आला. त्यात 14.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 121 कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. कंटेनर सुरक्षितपणे हलविण्यात आले.

दरम्यान, 20 एप्रिल रोजी संपूर्ण माल चोरीला गेल्याचे आढळून आले. तेव्हापासून कॅनडाचे पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही टोळी कॅनडात आहे की नाही, हे अद्याप कळू शकलेले नाही, तसेच कोणताही मोठा सुगावा हाती लागला नाही.

दरम्यान, ही घटना अनोखी असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत हा माल कोणत्या कंपनीचा होता आणि तो कोणत्या विमान कंपनीकडून आणला गेला आणि त्याचे वजन किती हे सांगता येणार नसल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.

1952 साली चोरी झाले सोने

साधारण 1952 सालची गोष्ट आहे. टोरंटोहून एक विमान कॅनडाच्या मॉन्ट्रियल भागात पोहोचले होते. लँडिंग केल्यानंतर फ्लाइटमधून आलेल्या 10 सोन्याच्या बॉक्सपैकी 4 चोरीला गेल्याचे आढळून आले. तेव्हा चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत 14 कोटी रुपये होती.

1974 मध्येही 27 कोटींचे सोने चोरीला गेले होते.

कॅनडामध्ये 1974 मध्ये खुलेआम सोन्याची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. यादरम्यान ओटावा विमानतळावरून एका खोलीत ठेवलेले 27 कोटी रुपयांचे सोने चोरीला गेले. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रात्री 11:30 वाजता चोरट्यांनी रूमच्या गार्डला बंदुकीच्या जोरावर धमकावले आणि त्याला पाईपला बांधले. या संपूर्ण प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT