cabinet reshuffle is in full swing, with a new twist in the ruling coalition Dainik Gomantak
ग्लोबल

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मनसुब्यावर पाणी फिरले, सत्ताधारी आघाडीत नवा पेच

वृत्तानुसार, देउबा यांचे मंत्रिमंडळातील युनिफाइड सोशलिस्ट्सच्या काही मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. त्या मंत्र्यांनी आपल्याच पक्षाची मागणी फेटाळून लावण्यासाठी देउबा यांच्यावर दबाव आणल्याचे बोलले जाते.

दैनिक गोमन्तक

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी फेडरल मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा मित्रपक्षांचा इरादा धुडकावून लावला आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीत असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाइड सोशालिस्ट सोबत देउबा यांचा पक्ष नेपाळी काँग्रेसच्या संबंधात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

(cabinet reshuffle is in full swing, with a new twist in the ruling coalition)

माधव कुमार नेपाळ यांच्या नेतृत्वाखालील युनिफाइड सोशलिस्ट पार्टीने रविवारी फेडरल कॅबिनेटमधील आपल्या चारही मंत्र्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. मात्र देउबा यांनी युनिफाइड सोशलिस्टचा हा इरादा तूर्तास हाणून पाडला आहे. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात तत्काळ फेरबदल होण्याची शक्यता नाकारली आहे. माधवकुमार नेपाळसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अर्थसंकल्पाचे कारण दिले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देउबा यांचे मंत्रिमंडळातील युनिफाइड सोशलिस्ट्सच्या काही मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. त्या मंत्र्यांनी आपल्याच पक्षाची मागणी फेटाळून लावण्यासाठी देउबा यांच्यावर दबाव आणल्याचे बोलले जाते. देउबा यांनाही सध्या मंत्रिमंडळात कोणताही बदल नको आहे. पुढच्या अर्थसंकल्पावर सरकारमध्ये चर्चा सुरू असताना, मंत्र्यांच्या बदलामुळे जनतेत चांगला संदेश जाणार नाही, असे नेपाळी काँग्रेसचे मत आहे.

सत्ताधारी आघाडीत सहभागी असलेल्या अन्य काही पक्षांनीही या फेरबदलाला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. देउबा यांनी सोमवारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी केंद्र) अध्यक्ष पुष्प कमल दहल, जनता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र यादव आणि माधव कुमार नेपाळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर यादव पत्रकारांना म्हणाले- 'आम्ही सांगितले की फेरबदलाची चर्चा तूर्तास स्थगित करावी. आता अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळालेली नाही, तर मंत्री कसे बदलणार?

वृत्तानुसार, उपेंद्र यादव यांच्या पक्षातूनही पक्षाचे मंत्री बदलण्याची मागणी होत आहे. यादव यांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेही त्यांनी फेरबदलाला विरोध केल्याचे बोलले जात आहे. देउबा मंत्रिमंडळाची स्थापना गेल्या वर्षी जुलैच्या मध्यात झाली होती. युनिफाइड सोशलिस्ट्सप्रमाणेच जनता समाजवादी पक्षाकडेही चार मंत्री आहेत.

नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी

काठमांडू पोस्ट या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, नेपाळी काँग्रेसमधीलच नेते, ज्यांना मंत्री बनण्याची आकांक्षा आहे, ते मंत्रिमंडळ फेरबदलाची वकिली करत आहेत. पक्षाचे सरचिटणीस गगन थापा यांनी हे मान्य केले आहे. ते म्हणाले- 'काही लोक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे बोलत आहेत. दुसरीकडे, जे मंत्री आहेत त्यांना काम दाखवण्याची संधी द्या, असे म्हणत आहेत. आता याबाबतचा निर्णय देउबा यांना घ्यायचा आहे, कारण या सरकारचा कार्यकाळ जास्त नाही.

देउबा यांनी मंत्रिमंडळात फेरबदल न केल्यास युतीमध्ये वाद होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. माधव कुमार नेपाळ आधीच नाराज आहेत की नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकीत युतीच्या भागीदारांनी त्यांच्या पक्षाला मदत केली नाही. आता त्यांची फेरबदलाची मागणीही मान्य होत नसल्याने ते स्वत:साठी नवा मार्ग काढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT