PM MODI- Bulgarian President Rumen Georgiev Radev Dainik Gomantak
ग्लोबल

'हिंदी महासागरातील दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारत...' बल्गेरियाने आभार मानल्यानंतर PM Modi नी स्पष्टच सांगतिलं

PM Modi: त्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 'मित्र यासाठीच असतात' असे म्हटले होते.

दैनिक गोमन्तक

Bulgarian President express gratitude to pm Modi

भारतीय नौदलाने १७ मार्च २०२४ ला अपहरण केलेल्या जहाजाची सुटका केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर भारतीय नौदलावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. आता मात्र बल्गेरियाचे राष्ट्रपति रुमेन रादेव यांनी सोशल मडिया हँडल एक्स ( X ) वर ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

'भारतीय नौदलाने धाडस दाखवत बल्गेरियाचे एमव्ही रौन ( MV RUEN )हे अपहरण केलेले जहाज सुखरुपरित्या सोडवत क्रू आणि ७ बल्गेरिअन नागरिकांची सुटका केली त्याबद्दल मी कृतरज्ञता व्यक्त करतो' असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत आभार मानले आहेत. याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, 'आम्ही आनंदी आहोत की बल्गेरियाचे ७ नागरिक सुरक्षित आहेत ते लवकरच सुरक्षितपणे मायदेशी परततील. भारत सुरक्षित जहवाहतुकीसाठी समर्पित आहे. हिंदी महासागरातील चोरीच्या घटना आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.'

याआधी, बल्गेरियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी देखील सोशल मिडिया हँडलवरुन भारताचे आभार मानले होते. त्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 'मित्र यासाठीच असतात' असे म्हटले होते.

दरम्यान, भारतीय नौदलाने १७ मार्च २०२४ ला अपहरण केलेल्या जहाजाची सुटका केल्याची माहिती समोर आली होती. याबरोबरच, 35 समुद्री चाच्यांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी संध्याकाळी क्रूला कोणतीही हानी न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आयएनएस कोलकाताने एमव्ही रौन हे अपहरण केलेले जहाज भारतीय किनारपट्टीपासून 2600 किमी अंतरावर रोखले होते. INS सुभद्रा, ड्रोन आणि P8I सागरी गस्ती विमानांद्वारे चाच्यांवर नजर ठेवण्यात आली होती. नंतर मार्कोस कमांडोना जहाजावर पाठवण्यात आले.

भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, ते या प्रदेशातील सागरी सुरक्षा आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. नौदलाने एमव्ही रौन या जहाजावरील 17 जणांच्या क्रूसोबत यशस्वीरित्या संवाद साधला आहे. क्रूमध्ये अंगोला, बल्गेरिया आणि म्यानमारमधील नागरिकांचा समावेश आहे. येमेनचे हुथी बंडखोर लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले करत आहेत. त्याचेच अनुकरण करत समुद्री चाचेही हिंदी महासागरात जहाजांचे अपहरण करत आहेत. भारतीय नौदलाने गेल्या काही महिन्यांत अनेक जहाजांची सुटका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT