Rishi Sunak  Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची दावेदारी मजबुत

UK PM Race: ऋषी सुनक व्यतिरिक्त, तीन कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार पेनी मॉर्डंट, लिझ ट्रस आणि कॅमी बॅडेनोक अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा दावा बळकट झाला आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या अगदी जवळ आले आहेत. सोमवारी झालेल्या मतदानाच्या तिसऱ्या फेरीत ऋषी 115 मतांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे गेले आहेत. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. आज चौथ्या फेरीचे मतदान पार पडणार आहे. (Britain Rishi Sunak Leads PM Race news)

ब्रिटनमध्ये (Britain) तिसऱ्या फेरीसाठी एकूण 357 मते पडली. मैदानात फक्त चार विरोधक उरले आहेत. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना तिसऱ्या फेरीत 115 मते मिळाली, म्हणजे दुसऱ्या फेरीपेक्षा 14 मते जास्त मिळाली आहे. त्यामुळे आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान असतील अशी चर्चा आहे.

* तिसऱ्या फेरीत ऋषी सुनक यांची दावेदारी मजबुत

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत तिसऱ्या फेरीतील विजयानंतर उत्साहाने भरलेल्या ऋषींनीही ब्रिटनला अधिक मजबूत बनवण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, एकत्रितपणे आपण आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभारू शकतो. ब्रेक्झिट वाचवता येईल. ऋषी सुनक यांच्याशिवाय कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (Conservative Party) तीन उमेदवार पेनी मॉर्डेंट, लिझ ट्रस आणि केमी बॅडेनोक अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. त्याचवेळी, तिसऱ्या फेरीत कमी मते मिळाल्याने टॉम तुगेंधत हे शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

* पंतप्रधानपदासाठी कोणत्या उमेदवाराला किती मते?

ब्रिटनमधील निवडणुकीच्या या फेरीत ऋषी सुनक यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डाउंट (Penny Mordaunt) 82 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी लिझ ट्रस (Liz Truss) 71 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कॅमी बडेनोच 58 मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. या फेरीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले टॉम तुगेंधत यांना केवळ 31 मते मिळाली. गुरुवारपर्यंत केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहणार आहेत. 5 सप्टेंबरपर्यंत, विजयी उमेदवार तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT