Britain New PM|  Dainik Gomantak
ग्लोबल

Britain New PM: लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान - आज घेणार शपथ

Britain PM Liz Truss: लिझ ट्रस यांनी निवडणुकीत प्रतिस्पर्धी ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकल्यानंतर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या लिझ ट्रस पंतप्रधानपदाची आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना पराभूत करून लिझ (Liz Truss) ब्रिटनची पंतप्रधान बनणार आहे. बोरिस जॉन्सन यांच्या जागी त्या पंतप्रधान होतील. देशाच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी शीर्ष कॅबिनेट मंत्र्यांची नवीन टीम नियुक्त करण्यापूर्वी लिझ ट्रस स्कॉटलंडमध्ये राणी एलिझाबेथ यांची भेट घेणार आहेत. (Liz Truss Set To Become UK PM)

युनायटेड किंगडमच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीने सोमवारी जाहीर केले की त्यांनी लिझ ट्रस यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. ट्रस यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ऋषी सुनक यांचा निवडणुकीत पराभव केला. लिझ ट्रस यांना 81,326 मते मिळाली तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली.

लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय मंगळवारी लिझ ट्रस यांना पंतप्रधान म्हणून औपचारिकपणे नामनिर्देशित करतील. लिझ ट्रस या 2016 पासून ब्रिटनच्या चौथ्या आणि देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनतील. त्यांच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे या खुर्चीवर राहिल्या आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन मंगळवारी स्कॉटलंडला जाऊन राणी एलिझाबेथ यांच्याकडे औपचारिकपणे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. यादरम्यान लिझ ट्रसही त्याच्यासोबत असेल. राणी एलिझाबेथ त्यांना सरकार स्थापनेची शपथ देतील.

लिझ ट्रस पंतप्रधान म्हणून प्रथमच 7 सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जाणार आहेत. लिझ ट्रस यांच्यासमोर महागाई, औद्योगिक अशांतता आणि देशातील आर्थिक मंदीची शक्यता यांना सामोरे जाण्याची मोठी आव्हाने असतील. जुलैमध्ये देशातील महागाई दर 10 टक्क्यांवर पोहोचला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, लिझ ट्रस यांनी कर वाढ परत आणण्याचे, महागाई नियंत्रित करण्याचे, वाढत्या ऊर्जेच्या किमतींना आळा घालण्याचे आणि बरेच उपाय करण्याचे आश्वासन दिले. पण आधीच गंभीर बनलेला महागाईचा प्रश्न कर कपातीनंतर आणखी बिकट होऊ शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

बोरिस जॉन्सनने (Boris Johnsons) आपली सहकारी लिझ ट्रस हिचे निर्णायक विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दुसरीकडे, पराभवानंतर ऋषी सुनक यांनी ट्विटरवर पाठिंबा देणाऱ्या पक्ष सदस्यांचे आभार मानले आहेत. ऋषी सुनक यांनी निवडणुकीत लिझ ट्रसला तगडी टक्कर दिली आहे. 2021 नंतर ट्रस हे पहिले पंतप्रधान आहेत. ज्यांना त्यांच्या पक्षाच्या 60 टक्क्यांहून कमी मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. लिझ ट्रस यांना केवळ 57 टक्के मते मिळाली, तर 2019 मध्ये जॉन्सन यांना पंतप्रधानपदासाठी 66.4 टक्के पक्ष सदस्यांचा पाठिंबा मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

SCROLL FOR NEXT