President of Brazil Dainik Gomantak
ग्लोबल

प्रत्येकाने 'रायफल' सोबत ठेवावी, बंदुका खरेदी करणाऱ्यांना त्रास देऊ नका: ब्राझील राष्ट्राध्यक्ष

उजव्या विचारसरणीचे असलेले बोल्सोनारो (President of Brazil) यांनी ब्राझीलवासीयांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे उचलण्याची परवानगी देण्यासाठी कायदे बदलण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला आहे.

दैनिक गोमन्तक

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Brazil President) अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा बोल्सोनारो त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणतात, प्रत्येकाने रायफल खरेदी करावी. शुक्रवारी राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या समर्थकांसमोर त्यांनी हे वक्तव्य केले. उजव्या विचारसरणीचे असलेले बोल्सोनारो यांनी ब्राझीलवासीयांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे उचलण्याची परवानगी देण्यासाठी कायदे बदलण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला आहे.

ते पुढे म्हणतात की, जे बंदुकीच्या विरोधात आहेत, त्यांनी ज्यांना बंदुका खरेदी करायच्या आहेत त्यांना त्रास देणे तात्काळ थांबवावे. आपल्या निवडणूक प्रचारादरम्यानही त्यांनी लोकांना वचन दिले होते की, आम्ही लवकरच बंदूक वापरण्यासंबंधीच्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करणार आहोत. वास्तविक, या देशात गुन्हेगारी आणि हिंसेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. (Jair Bolsonaro on Rifle). ज्यामुळे राष्ट्रपतींनी लोकांना सांगितले आहे की, त्यांच्याकडे (सामान्य लोकांकडे) स्वसंरक्षणासाठी स्वतःची शस्त्रे असावीत. जेणेकरुन ते स्वसंरक्षणासाठी त्याचा वापर करतील.

आता शस्त्रे खरेदी करणे सोपे आहे

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून, बोलसोनारो यांनी आपली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अनेक आदेश जारी केले आहेत. ब्राझीलमध्ये (Brazil Gun Violence) शस्त्र विकत घेणे किंवा त्याची मालकी असणे आता खूप सोपे झाले आहे. ब्राझीलच्या बंदूक कायद्यांतील शिथिलतेमुळे बोल्सोनारो यांच्या कार्यकाळात दोन वर्षांच्या आत बंदुक खरेदी तब्बल 65 टक्क्यांनी वाढली आहे. तर 2018 मध्ये लोकांकडे कायदेशीररीत्या 700,000 शस्त्रे होती. परंतु ही संख्या आता वाढून 12 लाख झाली आहे.

शस्त्रांची वेगाने वाढणारी संख्या

शस्त्रे ठेवणाऱ्यांमध्ये शिकारी, संग्रहकर्ता आणि सामान्य नागरिकांचाही समावेश आहे, जे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रे ठेवणे पसंद करतात. (Weapon Law in Brazil). ब्राझीलमधील प्रसिध्द दैनिक वृत्तपत्र ओ ग्लोबोनेही या प्रकरणाचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये फेडरल पोलिस आणि लष्करातून सर्व माहिती गोळा केली गेली आहे. हे आकडे दरवर्षी झपाट्याने वाढत आहेत. 2020 च्या अहवालानुसार, या देशातील फिरा डी सँटाना (Fira de Santana) शहर गुन्ह्यांच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. बहुतांश हत्या याच शहरामध्ये होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT