पाकिस्तानात हिंसाचार उफळण्याचे नक्की कारण तरी काय?; वाचा सविस्तर 

pakistan violance.jpg
pakistan violance.jpg
Published on
Updated on

पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून मोठा हिंसाचार उफळण्याच्या बातम्या समोर येत आहेत. पाकिस्तानातील तहरीक-ए- लाबिक पाकिस्तानाचा नेता साद रिजवी यांना अटक केल्याच्या विरोधात तहरीकचे कट्टर समर्थक देशभर आंदोलन करत आहेत.  इतकेच नव्हे तर या आंदोलकांनी फ्रान्सच्या राजदूताला पाकिस्तानमधून काढून टाकण्याची मागणीही केली आहे. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या आक्षेपार्ह चित्रांच्या मुद्द्यावरून फ्रान्सच्या राजदूतला देशाच्या बाहेर काढण्याची मागणी करण्याच्या मुद्द्यावरून  साद रिजवी यांनी  फ्रान्सच्या राजदूताला देशातून बाहेर काढून टाकण्याची मागणी केली होती. तसेच, सरकारने तसे न केल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशाराही दिली होता. (What exactly is the cause of the outbreak of violence in Pakistan ?; Read detailed) 

मात्र देशातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी लाहौर पोलिसांनी साद रिजवी यांना अटक केली.  यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोपही केला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या आक्षेपार्ह चित्राच्या विरोधात फ्रान्सच्या राजदूतला 20 एप्रिल पूर्वी बाहेर काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र सरकारने तसे न केल्याने सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप साद रिजवी यांनी केला. तर दुसरीकडे  रिझवी यांच्या समर्थकांनी या कारवाईचा निषेध करत पक्ष कार्यालयासमोर निदर्शने केली. सोमवारी त्यांनी लाहौरमधील काही रस्ते बंद अडवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सरकारने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला. तसेच  सरकारने रिजवी यांना  केवळ संसदेत या विषयावर चर्चा करण्याची परवानगी दिली.  मात्र  साद रिजवी यांच्या अटकेबाबत गुलाम मोहम्मद डोगर यांनी फारशी माहिती दिली नाही.  

पक्षाच्या इतर सदस्यांनी याबाबत माहिती दिली आहे.  तेहरीक-ए- लाबिक पाकिस्तान (टीएलपी) नेते साद रिझवी यांना सोमवारी लाहौरमध्ये अटक करण्यात आली.  त्याच्या अटकेची पोलिसांनी पुष्टी केली, परंतु कोणत्या आरोपात त्यांना अटक केली हे पोलिसांनी सांगितले नाही. त्यामुळे संतापलेल्या समर्थकांनी लाहोरमध्ये रस्ते आणि चौक रोखणाऱ्या हजारो निदर्शकांना पळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा व पाण्याचा शिडकावा केला. गेल्या वर्षी टीएलपी समर्थकांनी फ्रान्सविरोधी मोर्चाच्या मालिकेद्वारे तीन दिवस राजधानी बंद केली होती. यावर रिझवीच्या अटकेमुळे सरकारने फ्रेंच मुत्सद्दीला हद्दपार करण्याच्या कराराचे उल्लंघन केल्याच्या आरोप टीएलपीचे उपप्रमुख सय्यद जहीर-उल-हसन शहा यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत  केला आहे. 

याच हिंसाचारात बसखीनिमित्त पाकिस्तानातील गुरु ननकाना साहिब यात्रेला जाणारे अनेक शीख भाविक पाकिस्तानातील गुरु डेरा साहिब याठिकाणी अडकून पडले होते. मात्र बुधवारी त्यांना लाहौर पोलिसांनी सुरक्षितरित्या गुरु  साहिब याठिकाणी पोहचले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com