Bizarre Viral Love Story: जेव्हा कोणी रस्त्यावर आपला फोन चोरते तेव्हा आपण नाराज आणि संतप्त होऊन तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतो.
मात्र, ब्राझीलमधील इमॅन्युएला आपल्या सर्वांपेक्षा वेगळी आहे. कारण एका व्यक्तीने पहिल्यांदा तिचा फोन चोरला अन् नंतर हृदय.
मी कठीण परिस्थितीतून जात होतो कारण मला एकही प्रेयसी नव्हती. फोनवर तिचे फोटो पाहिल्यावर मी स्वतःशीच म्हणालो, 'किती सुंदर तरुणी आहे, तुला अशी तरुणी रोज दिसत नाही' आणि मला तिचा फोन चोरल्याचा पश्चाताप झाला.इमॅन्युएलाचा फोन चोरणारा व्यक्ती
ही घटना आहे ब्राझीलमधील. एका महिलेने दावा केला की ती तिचा फोन चोरलेल्या पुरुषाच्या प्रेमात पडली आहे.
ज्या क्षणी तिचा फोन चोरला गेला तो क्षण त्यांची 'फर्स्ट डेट' असल्याचे सांगण्यात आले. आणि, हे एकतर्फी प्रेम नव्हते. कारण फोन चोरणाऱ्या व्यक्तीने मीडियाला सांगितले की, फोनमधील तिचे फोटो पाहिल्यानंतर त्यालाही तिच्याबद्दल भावना निर्माण झाल्या.
इमॅन्युएला नावाच्या या महिलेने ब्राझीलमधील एका मीडिया इव्हेंटमध्ये त्यांच्या "पहिल्या डेटची" मजेशीर गोष्ट सांगितली. "मी तो राहतो त्या रस्त्यावरून चालत होतो आणि दुर्दैवाने, त्याने माझा फोन चोरला. त्याने माझा फोन तर चोरलाच पण त्याला पाहिल्यानंतर त्याने माझे हृदयही चोरले." या सर्व प्रकरणावर मत व्यक्त करताना एका स्थानिक म्हणाला “ब्राझीलमध्ये गुन्हेगाराच्या प्रेमात पडणे सामान्य आहे. प्रेम काहीही साध्य करू शकते."
असा विचित्र प्रकार समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशीच एक लव्ह स्टोरी ट्विटरवर व्हायरल झाली होती.
Reddit च्या एका यूजरच्या म्हणण्यानुसार , तो त्याच्या पत्नीला सोनी वर्ल्ड सिग्नलच्या अगदी जवळ भेटला, जिथे ते मित्र झाले.
उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते. तो तिची रस्ता ओलांडताना मदत करत असताना त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.