Two helicopters collide in Brazil Dainik Gomantak
ग्लोबल

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Brazil Helicopter Crash Video: ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली.

Manish Jadhav

Brazil Helicopter Crash Video: ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली. येथे दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच एकमेकांशी जोरदार टक्कर झाली. या भीषण टक्क्रीनंतर दोन्ही हेलिकॉप्टर्स एका इलेक्ट्रिक कार डीलरशिपच्या पार्किंग परिसरात कोसळले. या दुर्दैवी अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मृत दोन्ही हेलिकॉप्टर्समधील क्रू मेंबर्स होते.

हेलिकॉप्टर्स कोसळल्यानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे 20 गाड्या जळून खाक झाल्या. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु आगीचे रौद्ररुप पाहता एकाही व्यक्तीला जिवंत वाचवण्यात यश आले नाही.

ब्राझीलच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रिओ डी जनेरियोच्या पश्चिम उपनगरात झाला. हे दोन्ही हेलिकॉप्टर्स प्रवाशांना घेऊन वेगवेगळ्या दिशेने जात होते. मात्र, अचानक दोन्ही हेलिकॉप्टर्स हवेत एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही हेलिकॉप्टर्सचे पंखे एकमेकांवर आदळले आणि ते एकमेकांत अडकून वेगाने खाली कोसळले. ही टक्कर इतकी जोरदार होती की, जमिनीवर पडताच एका हेलिकॉप्टरने (Helicopter) पेट घेतला. या आगीमुळे घटनास्थळावरुन आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट उठताना दिसले, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ब्राझीलच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून केली जात आहे. हा अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्राथमिक तपासानुसार, खराब हवामान, वैमानिकाची चूक किंवा हवाई वाहतूक नियंत्रणातील त्रुटी यामुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. रिओ डी जनेरियो शहरात पर्यटन, वाहतूक आणि खाजगी प्रवासासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

मात्र, तिथे अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार समोर येत असतात, ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. ब्राझील (Brazil) सरकारने या अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. सध्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT