Brazil Bus Accident Dainik Gomantak
ग्लोबल

वळण ठरलं जीवघेणं! धार्मिक उत्सवावरुन परतताना काळाचा घाला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा भीषण अपघात; 15 ठार VIDEO

Brazil Bus Accident: ब्राझीलमधून भीषण रस्ते अपघाताची धक्कादायक घटना समोर आली. या जीवघेण्या अपघातात 15 भाविकांना आपला जीव गमवावा लागला.

Manish Jadhav

Brazil Bus Accident: ब्राझीलमधून भीषण रस्ते अपघाताची धक्कादायक घटना समोर आली. या जीवघेण्या अपघातात 15 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. हा अपघात ईशान्य ब्राझीलमधील अलागोआस राज्याच्या ग्रामीण भागात घडला. सुमारे 60 भाविकांना घेऊन जाणारी एक बस एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरुन खाली उतरली आणि उलटली.

या भीषण अपघातात लहान मुले आणि महिलांसह 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. बस उलटल्यामुळे काही प्रवासी बाहेर फेकले गेले, तर काही दुर्दैवी प्रवासी बसच्या खाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने बस सरळ केली आणि खाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.

अपघाताचे (Accident) वृत्त समजताच रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत काही जखमींची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सध्या इतर जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतांचे शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहेत. तसेच, अपघातग्रस्त बस जप्त करुन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अलागोआसचे गव्हर्नर पाउलो दांतास यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून राज्यात तीन दिवसांचा शोक जाहीर केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट लिहून मृतांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी माहिती दिली की, ही बस 'आवर लेडी ऑफ कँडेलारिया' या वार्षिक धार्मिक उत्सवातून परतत असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये 7 महिला, 5 पुरुष आणि 3 बालकांचा समावेश आहे. सरकारकडून पीडित कुटुंबांना लवकरच नुकसान भरपाई जाहीर केली जाणार आहे.

अलागोआस विमान वाहतूक विभागाचे संचालक कर्नल आंद्रे मेडिरो यांनी सांगितले की, बस वळण घेत असताना रस्त्यावरुन खाली घसरली आणि उलटली. बसच्या खाली अडकल्यामुळे गुदमरुन आणि गंभीर जखमांमुळे बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये अशा प्रकारच्या बस अपघातांची मालिका थांबताना दिसत नाहीये. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्येही पेर्नंबुको राज्यात असाच एक भीषण अपघात झाला होता, ज्यात 17 प्रवाशांनी आपला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या भीषण अपघातांमुळे आता ब्राझीलच्या वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि रस्ते सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT