United Airlines
United Airlines Dainik Gomantak
ग्लोबल

United Airlines Accident: भयानक, दोन विमानांची टक्कर अन्... नेमकं काय घडलं?

दैनिक गोमन्तक

Two United Airlines Airplane Collided: अमेरिकेच्या बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक दुर्घटना घडली. युनायटेड एअरलाइन्सच्या दोन विमानांनी एकमेकांना टक्कर दिली.

सीएनएनने फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनचा हवाला देत यासंदर्भात माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार, ही घटना सोमवारी म्हणजेच 6 मार्च रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली आहे.

एफएएने आपल्या निवेदनात सांगितले की, बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील युनायटेड एअरलाइन्स प्लाइट 515 च्या उजव्या विंगने सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइट 267 पाठीमागून धडक दिली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे दोन्ही विमान बोईंग 737 आहेत जे उड्डाण भरणार होते.

या दोन्ही विमानातील प्रवाशांना दुपारी नियोजित दुसऱ्या विमानात बसवण्यात आले. पण या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या विमानातील एका प्रवाशाने हा अपघात खूप मोठा धक्का होता असे सांगितले तर दुसऱ्या प्रवाशाने मी विमानात होते, तेव्हा अचानक झटका लागला असे सांगितले.

मी उजव्या बाजूला पाहिले असता एक विमान अपघातग्रस्त झाल्याचे दिसले होते. सर्व प्रवासी घाबरुन आरडोओरडा करू लागले.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांची गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. प्रवाशांना ताबडतोब विमानातून खाली उतरवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT