Malik Shah Mohammad Khan: इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते मलिक शाह मोहम्मद खान यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दोन जण जखमीही झाले आहेत. माजी मंत्री मलिक शाह यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटानंतर तात्काळ डिस्पोजल युनिट घटनास्थळी पोहोचल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या स्फोटात जखमी झालेल्या दोघांना जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाच्या वेळी मलिक शाह मोहम्मद घरी उपस्थित नव्हते. खैबर पख्तूनख्वामधील बन्नू शहरात हा स्फोट झाला. मलिक शाह येथून निवडून आले असून ते खैबर पख्तूनख्वाच्या पीटीआय सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून संशयितांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा हल्ला आयएसआयच्या गुप्तहेरांनी केल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. पाकिस्तानचे सध्याचे सरकार, लष्कर आणि इम्रान खान यांच्या पक्षामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे ही घटना घडल्याचे मानले जात आहे. सरकार आणि लष्कर एका गटात असून विरोधी पक्ष नेते इम्रान खान तुरुंगात आहेत. निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाचे चिन्हही काढून घेण्यात आले.
दुसरीकडे, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अनेकदा विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे. पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेतही आयएसआयचा मोठा हस्तक्षेप आहे. दरम्यान, रविवारीच कराचीमध्ये 125 पीटीआय नेत्यांना अटक करण्यात आली. कराचीतील तीन तलवार भागात झालेल्या रॅलीनंतर ही अटक करण्यात आली. या रॅलीत पोलिस आणि इम्रान खान समर्थकांमध्ये झडप झाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 125 नेत्यांना अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.