Bomb blast in Afghanistan's capital Kabul  Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) काल पुन्हा एकदा भीषण स्फोट झाला आहे. शहरातील तैमानी रस्त्यावर हा स्फोट झाला असून यापूर्वी गुरुवारीही काबूलमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटाची पुष्टी करताना काबूल पोलिसांचे प्रवक्ते मुबीन खान (Mubin Khan) म्हणाले, "आज सकाळी चर्ही सलीम कारवां भागात स्फोट झाला, परंतु कोणीही मारले गेले नाही. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रस्त्याच्या कडेला असलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे . या स्फोटाबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.(Bomb blast in Afghanistan's capital Kabul)

17 नोव्हेंबर रोजी पश्चिम काबूलमध्ये एका वाहनाला लक्ष्य करून झालेल्या स्फोटात किमान एक जण ठार आणि तीन जण जखमी झाले होते. तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संस्कृती आणि माहितीचे उपमंत्री जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी केली जात आहे.मात्र, त्यांनी याबाबत अधिक खुलासा केला नाही. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट याआधी काबूलसह अफगाणिस्तानमधील बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा संशयाची सुई इस्लामिक स्टेटकडेच जात आहे.

12 नोव्हेंबर रोजी प्रांतीय तालिबान प्रवक्त्याने सांगितले की पूर्व अफगाणिस्तानातील जलालाबाद शहराजवळील एका गावात शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 15 लोक जखमी झाले होते. नांगरहार प्रांताचे अधिकृत प्रवक्ते कारी हनीफ यांनी सांगितले की, त्रिली शहरातील एका मशिदीत बॉम्ब ठेवण्यात आला होता.दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट नांगरहार प्रांतात सक्रिय असून तिथे तालिबानी सैनिकांना लक्ष्य करून दररोज हल्ले होत आहेत.

प्रदेशातील मशिदींना लक्ष्य करून आयएसच्या अतिरेक्यांनी हल्ले केल्याच्या घटना दुर्मिळ आहेत. हा भाग सुन्नी बहुल आहे. दहशतवादी संघटना देशातील अल्पसंख्याक शिया समुदायातील लोकांच्या मशिदींना लक्ष्य करते. अशा हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबान गुप्तचर सेवेच्या प्रवक्त्याने काबूलमध्ये पत्रकारांना सांगितले की एजन्सीने सुमारे 600 IS सदस्यांना अटक केली आहे, ज्यात या गटातील प्रमुख लोक आणि आर्थिक मदत पुरवणाऱ्यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT