Bulgaria Dainik Gomantak
ग्लोबल

Bulgaria: निर्जणस्थळी थांबलेल्या ट्रकमध्ये सापडले 18 मृतदेह, तपासात उघड झाले मोठे रहस्य

ट्रकमध्ये एकूण 52 प्रवासी होते आणि त्यांना बेकायदेशीरपणे बल्गेरियात आणले जात होते.

Pramod Yadav

बल्गेरियात एका कंटेनर ट्रकमध्ये 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये एका सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. बल्गेरियन सरकारने शुक्रवारी सांगितले की कंटेनरमध्ये सापडलेल्या 22 लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रकमध्ये एकूण 52 प्रवासी होते आणि त्यांना बेकायदेशीरपणे बल्गेरियात आणले जात होते.

बल्गेरियातील लोकोर्स्को गावाजवळ हे मृतदेह सापडले आहेत. स्थानिक लोकांनी पोलिसांना फोन करून अज्ञात ट्रक आल्याची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलेले दिसले. ट्रकमध्ये छोटे कंपार्टमेंट बनवून त्यात माणसे भरल्याचे तपासात समोर आले. बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्याने आणि उपासमारीने झाला. असे बल्गेरियाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, बल्गेरियाची राजधानी सोफियापासून काही अंतरावर हा ट्रक सापडला आहे. ट्रकचा चालक लोकांना तिथेच तडफडत सोडून पळून गेला. ट्रकमधील लोकांसाठी बनवलेला डबा झाकला होता असे पोलिसांनी सांगितले.

डेप्युटी प्रॉसिक्युटर जनरल बोरिसलोव्ह यांनी सांगितले की ट्रक सापडण्याच्या 10 ते 12 तास आधीच या लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत बल्गेरियातील 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये 6 किंवा 7 वर्षांचा एक लहान मुलगा आहे. या घटनेत बचावलेले लोक थंडीने थरथर कापत होते. त्यांनी बरेच दिवस काही खाल्ले नाही, प्यालेले नव्हते. प्राथमिक माहितीनुसार, हा ट्रक अफगाणिस्तानातून निघाला होता, जो काही दिवसांपूर्वी तुर्कीमार्गे बल्गेरियाला पोहोचला होता.

दरम्यान, 2019 मध्ये ब्रिटनमध्ये एक ट्रक थांबवण्यात आला तेव्हा त्यात 39 लोकांचे मृतदेह सापडले होते. बेकायदेशीरपणे ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात या लोकांना आपला जीवही गमवावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT