Taliban Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban: तालिबान्यांची क्रूरता पुन्हा दिसली; हजारो लोकांसमोर 2 जणांना दिली थरकाप उडवणारी शिक्षा

Taliban Crime News: अफगाणिस्तानात सत्तेत आल्यापासून तालिबान अनेक प्रकारचे निर्बंध लादत आहे. मागील काही दिवसांपूर्वी तालिबानने महिलांवर पुन्हा कडक निर्बंध लावले.

Manish Jadhav

Taliban Crime News: अफगाणिस्तानात सत्तेत आल्यापासून तालिबान अनेक प्रकारचे निर्बंध लादत आहे. मागील काही दिवसांपूर्वी तालिबानने महिलांवर पुन्हा कडक निर्बंध लावले. यातच आता, तालिबानने भर चौकात दोन जणांना मारुन टाकले. तालिबानने या दोन्ही व्यक्तींना सर्वांसमोर गोळ्या घालून ठार मारले. तालिबानची क्रूरता पाहून लोक भयभीत झाले. आग्नेय अफगाणिस्तानातील एका स्टेडियममध्ये मृत्यूची ही थरकाप उडवणारी घटना घडली. अशाप्रकारे दोन जणांना जाहीररित्या मारल्याने अफगाणिस्तानात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गझनी शहरातील अली लाला परिसरात असोसिएटेड प्रेस या न्यूज एजन्सीच्या वार्ताहरासह हजारो लोकांच्या उपस्थितीत दोघांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. तालिबानने या दोघांच्या कथित गुन्ह्यांबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की, अनेक न्यायालये आणि तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांनी कथित गुन्ह्यांसाठी दोघांना ही शिक्षा सुनावली.

एकाला 8 तर दुसऱ्याला 7 गोळ्या लागल्या

घटनास्थळी लोकांचा जमाव जमला होता आणि आत जाण्यासाठी ते अधीर झाले होते. शिवाय, धार्मिक विद्वानांनी पीडितांच्या नातेवाईकांना दोषींना माफ करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी त्यास नकार दिला. दुपारी एकच्या सुमारास एका व्यक्तीवर आठ तर दुसऱ्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून गुन्हेगारांना सार्वजनिकरित्या शिक्षा देण्यात आलेली ही चौथी घटना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT