Billionaires List: अदानी-हिडेंनबर्ग प्रकरणानंतर दररोज जगातल्या टॉप श्रीमंत व्यक्तींच्या क्रमाकांत फेरबदल होताना दिसत आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावात अदानी यांचे नावदेखील होते. मात्र हिडेंनबर्ग रिपोर्टनंतर त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.
अदानी जगातल्या पहिल्या 20 श्रीमंत व्यक्तींच्या सूचीमधून बाहेर पडले आहेत. मात्र भारतातले दुसरे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर मुकेश अंबानी यांनी या फोर्बच्या सूचीमध्ये 12 व्या क्रमाकांवरुन थेट 9 व्या क्रमाकांवर झेप घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे फोर्बने जारी केलेल्या सूचीमध्ये सोमवारी 12 क्रमांकावर होते.
दरम्यान, गेल्या 24 तासात त्यांच्या संपत्ती मध्ये वाढ झाली असून ते टॉप-10 बिलिनिअरच्या लिस्टमध्ये 9 व्या स्थानावर आले आहेत. गेल्या 24 तासात त्यांच्या शेअर( Share )च्या किंमतीत वाढ झाली असून मुकेश अंबानींना 28 हजार करोड रुपयांचा फायदा झाला आहे.
Forbes Real Time Billionaires Index नुसार संपत्तीमध्ये या झालेल्या वाढीमुळे मुकेश अंबानी यांची नेटवर्थ वाढून 85.4 अरब डॉलर झाली आहे. त्यामुळे जगातील ते 9 वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.