Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांना सत्ता सोडण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम, विरोधकांचा हल्लाबोल

पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची धोक्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People's Party) या विरोधी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना राजीनामा देण्यासाठी आणि नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

दरम्यान, स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिलावल भुट्टो यांनीही इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. द न्यूज इंटरनॅशनलच्या बातमीनुसार, बिलावल यांनी सोमवारी लालमुसामधील अवामी मार्चमध्ये नागरिकांना संबोधित करताना म्हटले, "इम्रान खान (Imran Khan) यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील."

तसेच, पीपीपी मधील एका नेत्यांनी म्हटले की, 'पंतप्रधान इम्रान खान इतके घाबरले आहेत, की त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना शिव्या देण्यास सुरु केले आहे.'

याशिवाय, देशातील आर्थिक संकटासाठी ‘कठपुतळी’ पंतप्रधानांना जबाबदार धरत बिलावल झरदारी म्हणाले की, 'वाढत्या महागाईचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT