पाक PM इम्रान खान यांची 'बोलंदाजी'; पण PM मोदी 'राझी' होणार का?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना टीव्ही डिबेटच्या माध्यमातून चर्चेचे आव्हान केले आहे.
Prime Minister Narendra Modi  & Pakistan's Prime Minister Imran Khan
Prime Minister Narendra Modi & Pakistan's Prime Minister Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना टीव्ही डिबेटच्या माध्यमातून चर्चेचे आव्हान केले आहे. अशा चर्चासत्राच्या माध्यमातून दोन्ही देश एकमेकांमधील वाद सोडवू शकतात, असे इम्रान खान यांनी (Imran Khan) म्हटले आहे. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेत कलम 370 रद्द केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कटू झाले आहेत. याआधीही काश्मीरवरुन दोन्ही देशांमध्ये तीन युद्धे झाली आहेत. (Pakistan's Prime Minister Imran Khan Has Called On Indian Prime Minister Narendra Modi For Talks)

दरम्यान, इम्रान खान यांनी रशियन मीडिया ग्रुप रशियन टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवरील चर्चेत भाग घ्यायला आवडेल."

Prime Minister Narendra Modi  & Pakistan's Prime Minister Imran Khan
इम्रान खान सरकार भारतापुढे झुकण्यास तयार!

ते पुढे म्हणाले, ''भारतीय उपखंडातील अब्जावधी लोकांसाठी हे फायदेशीर ठरेल, कारण यामुळे दोन्ही देशांना त्यांच्यातील समस्या चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतील.''

तसेच, विशेष म्हणजे दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे भारत पाकिस्तानला वारंवार सांगत आहे. दहशतवादाला लगाम घालण्यासाठी भारताने पाकिस्तानला सातत्याने बजावले आहे. विशेषत: अशा संघटना ज्यांना संयुक्त राष्ट्राने दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

Prime Minister Narendra Modi  & Pakistan's Prime Minister Imran Khan
इम्रान खान सरकार लवकरच बलुच बंडखोरांशी करणार चर्चा !

शिवाय, पाकिस्तानच्या (Pakistan) पंतप्रधानांनी दिलेल्या या प्रस्तावावर भारताकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, अशी कोणतीही मागणी मान्य करण्यापूर्वी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ला, पठाणकोट, उरी आणि पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा देण्याची मागणी भारत करु शकतो, असे मानले जात आहे. या हल्ल्यांनंतर भारताने आतापर्यंत पाकिस्तानवर दोनदा सर्जिकल स्ट्राइक केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com