Benny Gantz Dainik Gomantak
ग्लोबल

इस्रायलला मोठा धक्का, संरक्षणमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले इराणी हेर !

'मोसाद' (Mossad) या गुप्तचर संस्थेच्या जोरावर जगभरात आपली ताकद सिद्ध करणाऱ्या इस्रायलला (Israel) इराणने मोठा धक्का दिला आहे.

दैनिक गोमन्तक

'मोसाद' (Mossad) या गुप्तचर संस्थेच्या जोरावर जगभरात आपली ताकद सिद्ध करणाऱ्या इस्रायलला (Israel) इराणने मोठा धक्का दिला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गॅंट्झ (Benny Gantz) यांच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीवर ब्लॅक शॅडो हॅकर्स ग्रुपसाठी (Black Shadow Hackers Group) हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जो कथितरित्या इराणशी संबंधित एक गट आहे. इस्रायलच्या न्याय मंत्रालयाने म्हटले आहे की, लॉडच्या मध्यवर्ती शहरातील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय ओमरी गोरेन गोरोचोव्स्कीला (Omari Goren Gorochovsky) 4 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

दरम्यान, गोरोचोव्स्कीसाठी जारी केलेल्या अटक वॉरंटमध्ये म्हटले आहे की, त्याने यापूर्वी अनेक गुन्हे केले आहेत. पाच प्रकरणांमध्येही तो दोषी सिद्ध झाला आहे. तसेच बँक दरोडा (Israel Defence Minister Spying) यासह विविध गुन्ह्यांसाठी तो तुरुंगात गेलेला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संरक्षणमंत्र्यांच्या घरी एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला कसे काय ठेवण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एका वेगळ्या विधानात, सुरक्षा एजन्सी शिन बेटने सांगितले की, गोरोचोव्स्कीच्या हाती कधीही गुपीत कागदपत्रे हाती लागलेली नाहीत. म्हणून तो देशाशी संबंधित रहस्ये उघड करु शकला नाही.

ब्लॅक शैडोने हल्ला केला

आरोपी हा त्याच्या साथीदारासह संरक्षणमंत्र्यांच्या घरी सफाई कामगार म्हणून काम करत होता. गेल्या महिन्यात, ब्लॅक शॅडो हॅकर्सनी इस्रायली इंटरनेट सेवा प्रदात्याला लक्ष्य करुन सायबर हल्ला केल्याचा दावा केला होता. गोरोचोव्स्कीच्या आरोपपत्रात ब्लॅक शॅडोचे वर्णन 'इराणशी जोडलेले' (Iran Spy in Isreal News) असे केले आहे. या हाय-प्रोफाइल सायबर हल्ल्यानंतर, गोरोचोव्स्कीने 31 ऑक्टोबर रोजी टेलिग्रामद्वारे ब्लॅक शॅडोशी संपर्क साधला. ज्यामध्ये त्याने गॅंट्झ आणि त्याच्या घराशी संबंधित माहिती देण्याविषयी सांगितले.

डिटेक्टिव्ह नाव बदलून राहत होता

आरोपी नाव बदलून येथे काम करत असल्याचे इस्रायलचे म्हटले आहे. त्याने हॅकिंग ग्रुपला अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला (Iran Denence Minister Spy). आरोपपत्रानुसार, गोरोचोव्स्कीने ब्लॅक शॅडोच्या प्रतिनिधीला सांगितले की, मी पैशासाठी मालवेअरद्वारे माहिती देईल, ज्यासाठी मी यूएसबी डिव्हाइस वापरेन. आपली विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या घरातील अनेक गोष्टींची फोटो हॅकर्सच्या गटाला पाठवले आहेत. यामध्ये Gantz चे कामाचे टेबल, IP पत्त्यांसह स्टिकर्स असलेली पॅकेजेस, इस्रायली सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून Gantz च्या कार्यातील स्मृतिचिन्ह, त्यांच्या कुटुंबाची फोटो आणि मालमत्ता कराच्या पावत्या यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT