Turkey Coal Mine News Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Coal Mine News: तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट, 22 ठार तर अनेक जखमी

या स्फोटात जवळपास 22 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर तुर्कीतील (Turkey) कोळसा खाणीत स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, उत्तर तुर्कीमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, बचाव पथक खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

कुठे झाला स्फोट?

बार्टिनच्या काळ्या समुद्र किनारी प्रांतातील अमासरा शहरातील सरकारी टीटीके अमासरा मुसेसे मुडुर्लुगु खाणीत शुक्रवारी हा स्फोट झाला. ऊर्जा मंत्री फातिह डोनमेझ यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार हा स्फोट फायरॅम्पमुळे झाला असावा. 

  • स्फोटाच्या वेळी खाणीत 110 लोक उपस्थित होते'

बचाव कार्याचे समन्वय साधण्यासाठी अमासरा येथे गेलेले गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, स्फोटाच्या वेळी खाणीत 110 लोक उपस्थित होते. मंत्र्यांनी सांगितले की, स्फोटानंतर बहुतेक कामगार पळून जाण्यात यशस्वी झाले होते, परंतु 49 लोक अतिजोखमीच्या भागात अडकले होते. सुलेमान सोयलू यांनी अद्याप आत अडकलेल्या लोकांची संख्या दिलेली नाही. मात्र, 49 पैकी काहींना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • आज राष्ट्रपती अपघात स्थळाला भेट देणार आहेत

या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विटरवर दिली. खाणीमुळे (Mine) किती लोक जखमी झाले हे त्यांनी सांगितले नाही, मात्र आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. तुर्कस्तानची आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने सांगितले की, शेजारील प्रांतांसह अनेक बचाव पथके या भागात पाठवण्यात आली आहेत. यासह तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन शनिवारी अपघातस्थळी पोहोचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बनावट गिऱ्हाईक बनून पोलीस पोहोचले अन्... गोव्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची केली सुटका; दलालांचे धाबे दणाणले

अपहरण, जबरदस्ती अन् पाशवी अत्याचार! आर्केस्ट्रात काम करणाऱ्या तरुणीची 6 नराधमांनी लुटली अब्रु; पूर्णियाात ओलांडली क्रौर्याची सीमा

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT