Ashraf Ghani Dainik Gomantak
ग्लोबल

अशरफ घनी यांना मोठा धक्का, भाऊ तालिबानमध्ये सामील

हशमत गनी (Hashmat Ghani) यांनी तालिबान नेता खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेते मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत दहशतवादी गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचे राज्य येताच देश सोडून पळून गेलेले माजी राष्ट्रपती अशरफ घनी (Ashraf Ghani) यांच्या भावाने अफगाणिस्तानचा विश्वासघात केला आहे. हशमत गनीने (Hashmat Ghani) तालिबानशी हातमिळवणी केल्याची माहिती मिळत आहे. अहवालांनुसार, हशमत गनी यांनी तालिबान नेता खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेते मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत दहशतवादी गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

अशरफ घनी सध्या आपल्या कुटुंबासह संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहेत. काबुल न्यूजने बुधवारी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की, घनी काबूलमधून पळून गेल्यानंतर अबू धाबी, यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत. यापूर्वी तो शेजारील देश ताजिकिस्तानला गेले होते परंतु त्यांच्या विमानाला येथे उतरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. घनी यांनी नंतर बचावासाठी म्हटले की, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि ते "देशाच्या भविष्यासाठी विकास योजनांमध्ये योगदान देत राहतील".

अशरफ घनी यांच्यावर 15 ऑगस्ट रोजी काबुल तालिबानच्या ताब्यात दिल्यानंतर चार कार आणि हेलिकॉप्टरमध्ये पैसे घेऊन देश सोडून पळून गेल्याचा आरोप होता. सोमवारी रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को म्हणाल्या, "राजवटीचं पतन ... हे स्पष्ट करते की घनी अफगाणिस्तानातून कसे पळून गेले." चार गाड्या पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाच्या दुसरी खेप हेलिकॉप्टरमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण सर्व काही त्यात बसत नव्हते. दुसरीकडे मात्र, घनी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

सालेह स्वतःला अध्यक्ष घोषित करतो

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (Amarullah Saleh) यांनी नंतर स्वतःला देशाचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले. त्यांनी ट्विट केले की घटनेनुसार जर राष्ट्रपती अनुपस्थित असतील, मरण पावले किंवा राजीनामा दिला तर उपराष्ट्रपती त्यांच्या उपस्थितीत कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. सालेहने तालिबान बद्दल म्हटले आहे की युद्ध अजून संपलेले नाही. असे मानले जाते की तो अजूनही पंजशीर प्रांतात (Panjshir province) आहे आणि तालिबानच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहे. अहवालांनुसार, स्थानिक मुजाहिद्दीन लढाऊंनी काही तालिबानांना ठार केले आहे आणि गटातून पुल-ए-हेसर, देह सालाह आणि बानू जिल्हा परत मिळवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT