PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: ''हिटलरपेक्षा वेगळे नाहीत बेंजामिन नेतन्याहू", या मुस्लिम देशाच्या नेत्याची कठोर टिप्पणी

PM Benjamin Netanyahu: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबाबत एका देशाच्या मुस्लिम नेत्याची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल-हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबाबत एका देशाच्या मुस्लिम नेत्याची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. या मुस्लिम नेत्याने बेंजामिन नेतन्याहू यांची तुलना हिटलरशी केली आहे. हे विधान समोर आल्यानंतर नेतन्याहू चांगलेच संतापले. गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या जलद हवाई आणि जमिनीवरुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये सामान्य पॅलेस्टिनी मारले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कठोर टिप्पणी करण्यात आली आहे. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांना ठार केले आहे. यामध्ये बहुतांश पॅलेस्टिनी नागरिकांचा समावेश आहे.

दरम्यान, इस्रायलने गाझावर केलेला कहर आणि नागरिकांच्या भीषण हत्याकांडामुळे दु:खी झालेल्या तुर्की राष्ट्राध्यक्षांनी नेतान्याहू यांना 'हिटलर' म्हटले. अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू "हिटलरपेक्षा वेगळे नाहीत." गाझासोबतच्या युद्धावर इस्रायलवर टीका करताना त्यांची ही प्रतिक्रिया आली. हिटलर आणि नेतन्याहू यांच्यात फारसा फरक नसल्याचे एर्दोगन यांनी म्हटले.

तुर्की गाझावरील हल्ल्याला विरोध करत आहेत

गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याला तुर्की सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत. गाझा पट्टीमध्ये तात्काळ युद्धबंदी करण्याची मागणीही त्यांनी संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटनांकडे वारंवार केली आहे. असे असतानाही गाझामधील नागरिकांच्या मृत्यूची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गाझामध्ये नागरिक, लहान मुले, महिला आणि वृद्ध लोक मोठ्या प्रमाणात मारले जात आहेत. यामुळे संतप्त झालेल्या तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी नेतन्याहू यांची तुलना हिटलरशी केली. यामुळे तुर्की आणि इस्रायलमधील तणावही वाढू शकतो. तथापि, गाझा युद्धावरुन तुर्की आणि इस्रायलमध्ये आधीच मतभेद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT