IT Raid on BBC : जानेवारीत इंडिया : द मोदी क्वेश्चन अशी डॉक्यूमेंटरी प्रकाशित करणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) दिल्ली कार्यालयात प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापे टाकले.
ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोध मोदी सरकारवर करत असले तरी या बीबीसीच्या उत्पन्नाचे स्रोत काय, बीबीसीची स्थापना कधी झाली हे जाणून घेऊया...
बीबीसीची स्थापना
18 ऑक्टोबर 1922 रोजी स्थापन बीबीसीची स्थापना झाली. जॉन रेईथ यांनी बीबीसीची स्थापना केली. ते बीबीसीचे पहिले जनरल मॅनेजर होते. 1927 मध्ये जेव्हा बीबीसी पब्लिक कॉर्पोरेशन झाली तेव्हा ते कंपनीचे पहिले डायरेक्टर जनरल होते.
बीबीसी ही जगातील सर्वात जुनी राष्ट्रीय प्रसारक संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय वेस्टमिन्स्टर, लंडन येथे आहे. BBC ची स्थापना रॉयल चार्टर अंतर्गत झाली आहे.
ब्रिटिश संसद आणि बीबीसी
बीबीसीसाठी ब्रिटिश संसद निधी देते. तथापि, बीबीसी ही कंपनी युके सरकारच्या मालकीची असली तरी ती स्वतंत्रपणे काम करते. ब्रिटिश सरकार बीबीसीच्या कामात हस्तक्षेप करत नाही, त्यामुळेच ब्रिटिश सरकारच्या विरोधातील बीबीसी बातम्या देऊ शकते.
बीबीसीचे महसूल मॉडेल...
बीबीसीचा बहुतेक निधी थेट टेलिव्हिजन प्रसारणे प्राप्त करण्यासाठी किंवा रेकॉर्ड करण्यासाठी ब्रिटीश संस्थांना आकारल्या जाणार्या वार्षिक टेलिव्हिजन शुल्कातून येतो.
याशिवाय, बीबीसी स्टुडिओ आणि बीबीसी स्टुडिओवर्क्स या व्यावसायिक उपकंपन्यांकडूनही बीबीसीला उत्पन्न मिळते. गार्डियनच्या माहितीनुसार बीबीसीला परवाना शुल्काच्या उत्पन्नातून वर्षाला £3.2 अब्ज (264 अब्ज रूपये) महसूल मिळतो.
बीबीसीच्या सेवा
बीबीसी हा एक मोठा माध्यम समूह आहे. यात रेडिओ, वेबसाईट, टीव्ही, पॉडकास्ट इत्यादी माध्यमसेवांचा समावेश आहे. सुमारे 40 भाषांमध्ये बीबीसीची सेवा सुरू आहे.
युके पब्लिक सर्व्हिसेस, ग्लोबल सव्हिर्सेस आणि कमर्शियल सर्व्हिसेस अशा तीन विभागात बीबीसी सेवा देते. पैकी युके पब्लिक सर्व्हिसेसमध्ये युकेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा अंतर्भाव होतो.
ग्लोबल सर्व्हिसेसमध्ये जागितक स्तरावर बीबीसी करत असलेली आशयनिर्मिती आणि न्यूज सर्व्हिसेस यांचा समावेश होतो. तर कमर्शियल सर्व्हिसेसमध्ये बीबीसी आपण केलेला दर्जेदार कंटेट इतरांना विकत असते. बीबीसीच्या कमर्शियल सर्व्हिसेसद्वारे नवे कायर्क्रम आणि कंटेट निर्माण केला जातो, त्यातून बीबीसीला आर्थिक उत्पन्न मिळते.
बीबीसीच्याच हवाल्याने व्हरायटी डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार बीबीसीचा गतवर्षीची कमाई 6.4 बिलियन डॉलर म्हणजेच (सुमारे 529 अब्ज रूपये) इतकी आहे. भारतातही बीबीसी हिंदी, मराठी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये सक्रीय आहे.
बीबीसी आणि भारत
भारतात बीबीसीची हिंदी सेवा 11 मे 1940 रोजी सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात भारतात बीबीसी इंग्लिश हिंदीसह बंगाली, नेपाळी, तमिळ, गुजराती, मराठी, पंजाबी आणि तेलगू तसेच उर्दू (प्रामुख्याने पाकिस्तानात) या भाषांमध्ये सेवा देते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.