Bangkok Oil Refinery Explosion News: थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात गुरुवारी (26 नोव्हेंबर) अचानक मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना तात्काळ घरे रिकामी करुन सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश प्रशासनाने दिले. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
बँग ना जिल्हा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तेल शुद्धीकरण आणि साठवणूक प्रकल्पाची मालकी असलेल्या 'बँगचाक कॉर्पोरेशन' कंपनीने परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आणली असल्याचे स्पष्ट केले. तरीही, खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्पाजवळ राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना तातडीने परिसर रिकामा करण्याचा सल्ला देण्यात आला. या भीषण स्फोटामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, प्रशासनाकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. बँकॉकच्या पूर्व भागातील या प्रकल्पातून आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट उठताना या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले.
'बँगचाक कॉर्पोरेशन'ची ही बँकॉक रिफायनरी दररोज 1 लाख 20 हजार बॅरल तेल शुद्ध करण्याची क्षमता आहे. ही थायलंडमधील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी रिफायनरी असून, देशातील नागरी वस्तीत असलेला हा एकमेव असा प्रकल्प आहे. दाट लोकवस्तीच्या भागात हा प्रकल्प असल्याने प्रशासनाने तातडीने सतर्कता बाळगत बचाव आणि नियंत्रणाची पावले उचलली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.