Baba Venga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga Predictions: बाबा वेंगांची भारताबाबत भविष्यवाणी, 2023 मध्ये होणार मोठा विनाश!

Baba Vanga Predictions 2023: तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपासारखाच भूकंप आशियामध्येही दिसू शकतो, असे सांगण्यात येत असून भारताबाबतही एक महत्त्वाची भविष्यवाणी समोर आली आहे.

Manish Jadhav

Baba Vanga: अलीकडेच तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपासारखाच भूकंप आशियामध्येही दिसू शकतो, असे सांगण्यात येत असून भारताबाबतही एक महत्त्वाची भविष्यवाणी समोर आली आहे.

दरम्यान, हे भाकीत बाबा वेंगा यांनी केले होते. बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे बहुतेक अंदाज खरे ठरले आहेत. याच क्रमाने 2023 बाबत त्यांनी भारतासाठी (India) एक महत्त्वाची भविष्यवाणीही केली होती. 1996 मध्ये बाबा वेंगाचे निधन होऊनही, बाबा वेंगा यांचे भाकीत अजूनही खरे ठरत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

बाबा वेंगा

दुसरीकडे, तुर्कस्तान आणि सीरियातील (Syria) भूकंपाच्या काही दिवसांपूर्वी नेदरलँडचे संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्कस्तान आणि सीरियाच्या आसपासच्या भागात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्याचवेळी नैसर्गिक आपत्तींचाही अंदाज बाबा वेंगा यांनी वर्तवला होता. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये अनेक भयानक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केले आहे.

फ्रँक HuggerBeats

यासोबतच आता फ्रँक हगरबीट्सने भारताबाबत एक भविष्यवाणी केली आहे. फ्रँक हूगरबीट्स म्हणतात की, भारत-अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो. त्याचवेळी, बाबा वेंगा यांनी भारतासह अनेक आशियाई देशांसाठीही अशीच काही भविष्यवाणी केली आहे.

अणुस्फोट होणार

बाबा वेंगा यांनी आधीच भाकीत वर्तवले होते की, आशियातील कोणत्यातरी देशात अणुस्फोट होईल, त्यामुळे भारताचे मोठे नुकसान होईल. पृथ्वीवर एक मोठी भूवैज्ञानिक घटना घडेल, ज्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत बदल होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल. पृ

थ्वीच्या कक्षेत बदल झाल्यास पृथ्वीवर भयानक भूकंप होतील. अशा परिस्थितीत त्या भूकंपाच्या तडाख्यात कोणता देश येतो, हा चिंतेचा विषय ठरणार आहे. यासोबतच बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये सौर त्सुनामीचीही भविष्यवाणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT