Attack on American Warship in Red Sea Dainik Gomantak
ग्लोबल

American Warship: महासत्तेला मोठा झटका, लाल समुद्रात अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला

Attack on American Warship in Red Sea: लाल समुद्रात अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Attack on American Warship in Red Sea: लाल समुद्रात अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने काल म्हणजेच रविवारी ही माहिती दिली. ड्रोनने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायल-हमास युद्धादरम्यान हा हल्ला एक मोठी घटना मानली जात आहे. पश्चिम आशियातील सागरी हल्ल्यांच्या वाढत्या घटना म्हणून याकडे पाहिले जात आहे. हा हल्ला येमेनजवळ झाला असून अद्याप कोणीही त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पेंटागॉनने म्हटले आहे की, लाल समुद्रातील यूएसएस कार्नी आणि कमर्शियल जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत आम्हाला माहिती आहे आणि याबाबतची अधिक माहिती मिळताच शेअर करु.

प्रथम जहाजाचे अपहरण करण्यात आले

याआधी येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात एका जहाजाचे अपहरण केले होते. हे जहाज भारतात येत होते. याचा एक व्हिडिओही समोर आला होता. हुथी बंडखोरांनी ते इस्रायली जहाज असल्याचे समजून त्याचे अपहरण केल्याचे बोलले जात होते. येमेनच्या या भागात हुथी बंडखोर खूप सक्रिय आहेत. या भागात बंडखोर स्वतःचे सरकार चालवतात. ज्या युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला ती अमेरिकन नौदलाची अर्ली बर्क क्लास युएसए कार्नी ही युद्धनौका आहे.

यापूर्वी, लाल समुद्रात संशयास्पद ड्रोन हल्ला आणि स्फोट झाल्याची भीती ब्रिटिश लष्कराने व्यक्त केली होती. या हल्ल्यांनंतर अमेरिका मध्यपूर्वेत सुरु असलेल्या लष्करी संघर्षात अडकण्याची भीती आहे. ही एका नवीन प्रकारच्या संकटाची सुरुवात असू शकते. जगाला अशा दोन युद्धांचा फटका बसला आहे. पहिले युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये तर दुसरे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT