Terror Attack on Pakistan Military Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानी लष्करावर दहशतवाद्यांचा हल्ला, चकमकीत एक कर्नल आणि तीन जवान शहीद

Terror Attack on Pakistan Military: खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर पुन्हा एकदा कहर केला आहे. वृत्तानुसार, प्रांतातील खैबर जिल्ह्यातील तिराह भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कराचा एक अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले.

Ashutosh Masgaunde

Attack by Pakistani Army terrorists, one colonel and three soldiers martyred:

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्ला केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रांतातील खैबर जिल्ह्यातील तिराह भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कराचा एक अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले.

पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा 'इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स' (ISPR) ने एका निवेदनात म्हटले आहे की, गुप्तचर माहितीच्या आधारे केलेल्या कारवाई दरम्यान लेफ्टनंट कर्नल मोहम्मद हसन हैदर आणि तीन सैनिक मारले गेले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ऑपरेशन दरम्यान, लेफ्टनंट कर्नल हैदर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रभावीपणे घेरले होते.

आयएसपीआरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कारवाईत ३ दहशतवादी मारले गेले. याशिवाय अन्य तीन दहशतवादीही जखमी झाले आहेl.

आयएसपीआरच्या म्हणण्यानुसार, परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे जेणेकरून आणखी कोणी दहशतवादी सापडल्यास त्याचा खात्मा करता येईल.

अंतरिम पंतप्रधान अन्वर उल-हक काकर यांनी लष्करी अधिकारी आणि तीन जवानांच्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. जोपर्यंत देशातून दहशतवादाचा समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत दहशतवादाविरुद्धचे युद्ध सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांत दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर सातत्याने हल्ले केले असून, त्यात डझनभर सैनिक आणि अधिकारी शहीद झाले आहेत.

पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या दोन वाहनांवर हल्ला केला, ज्यात 14 सैनिक ठार झाले.

बलुचिस्तानमध्ये गेल्या शुक्रवारचा दहशतवादी हल्ला या वर्षातील सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे, ज्यात पाकिस्तानी लष्कराचे सर्वाधिक सैनिक मारले गेले आहेत.

त्याचवेळी, गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सुरक्षा चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे किमान तीन जवान जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT