S. Jayshankar Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorism: आतंकवाद कधी संपणार हे तुमच्या मंत्र्यांना विचारा- एस.जयशंकर यांचे पाकिस्तानच्या पत्रकाराला उत्तर

Terrorism: जयशंकर यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

दैनिक गोमन्तक

Terrorism: भारताची भूमिका पहिल्यापासून दहशतवादाविरोधी राहिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधी पाऊले उचलण्यासाठी भारताने इतर देशांना प्रेरणा दिली आहे.तरीही भारत पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीर, घुसखोरी आणि दहशतवाद या मुद्द्यावरुन आरोप -प्रत्यारोप होत असतात.

नुकत्याच झालेल्या एका पत्रकारपरिषदेत दहशतवादाचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने दहशतवादाबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यावर जयशंकर यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जेव्हा पाकिस्तानच्या पत्रकाराने एस.जयशंकर यांना भारत, अफगाणिस्तान , पाकिस्तानमधील दहशतवाद कधी संपेल , दक्षिण आशियातील हा संघर्ष कधी संपेल असे तुम्हाला वाटते असे विचारले. जयशंकर यांनी याचे उत्तर देताना तुम्ही चुकीच्या मंत्र्याला प्रश्न विचारला आहे, असे म्हटले आहे.

त्याचबरोबर ते पुढे म्हणतात की, जेव्हा पाकिस्तानचे मंत्री दहशतवादाला थारा देणार नाहीत,ते जेव्हा ठरवतील तेव्हा दहशतवाद ( Terrorism ) संपेल . जग मूर्ख नाही, जग काही विसरत नाही आणि जगाला प्रोत्साहन देणारे देश ,संस्था जगाला माहिती आहेत. चर्चा वेगळ्या दिशेला नेऊन तुम्ही सत्य लपवू शकत नाही. माझा सल्ला आहे की चांगली कृती करा, चांगले शेजारी बना आणि आर्थिक प्रगती विकास यासारख्या गोष्टींकडे लक्ष द्या. बाकीचे देश विकासाकडे लक्ष देत आहेत. तुम्हीही तसा प्रयत्न करा असे एस.जयशंकर यांनी उत्तर देताना म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोव्याच्या डॉ. अंजनेय कामतची भरारी! NEET-PG 2025 मध्ये राज्याचा प्रथम क्रमांक

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

Education: भारतीय विद्यार्थ्यांचा कल करिअर केंद्रित शिक्षणाकडे, लंडनमधील विद्यापीठाचा परदेशातील शिक्षणाबाबत अहवाल

Delhi Blast: "दिल्लीतील स्फोट आम्हीच केला..." पाकिस्तानी नेत्याची जाहीर कबुली Watch Video

SCROLL FOR NEXT