ASEAN-India Summit Dainik Gomantak
ग्लोबल

ASEAN-India Summit: मोदींचे इंडोनेशियामध्ये जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ

ASEAN-India Summit: आपल्या भागीदारीचे हे चौथे दशक आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

ASEAN-India Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. जकार्ता येथे भारत आसिआनची २० शिखर परिषद आणि 18 वी पूर्व आशिया शिखर परिषद पार पडत आहे. त्यासाठी मोदींनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांचे दणक्यात स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले.

आसिआन ही भारताच्या अॅक्ट इस्ट पॉलीसी साठी महत्वाचा भाग आहे. भारताची पॉलीसीचा अवलंब करण्यात आसिआन समूह मध्यवर्ती भूमिका पार पाडतो. इंडोनेशिया येथे आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आपला इतिहास आणि भूगोल भारत आणि आसियान यांना एकत्र आणतो. त्यासोबतच आपली मूल्ये, प्रादेशिक एकात्मता आणि शांतता, समृद्धी आणि बहुध्रुवीय आपल्याला एकत्र करते.

भारत- आसियान आणि इंडो-पॅसिफिक याविषयी आसियानच्या दृष्टिकोनाचे भारत समर्थन करतो."आपल्या भागीदारीचे हे चौथे दशक आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे अभिनंदन करू इच्छितो.

पुढे बोलताना मोदी म्हणतात- आसियान महत्त्वाचा आहे कारण येथे प्रत्येकाचा आवाज ऐकला जातो आणि आसियान हा विकासाचा केंद्रबिंदू आहे कारण आसियानची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे या वर्षीची थीम ASEAN Matters: Epicentrum of Growth ही आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 व्या ASEAN-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित होण्यापूर्वी आज भारतीय वंशाच्या नागरिकांची भेट घेत संवाद साधला आहे.

महत्वाचे म्हणजे इंडोनेशियन समुदायाच्या सदस्यांनी पतंप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले आहे. "आम्ही येथे भारतावर प्रेम करणाऱ्या इंडोनेशियन समुदायातून आलो आहोत. पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी आणि इंडोनेशियामध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असे इंडोनेशियन वंशाच्या नागरिकांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT