Illness  Dainik Gomantak
ग्लोबल

Artificial Intelligence: भविष्यातील आजार उघड होणार!

दैनिक गोमन्तक

रोजच्या वाढत्या धावपळीच्या युगात शरीराकडे होणारे दुर्लक्ष, शिशु पासुन वृधांपर्यतच्या शरीरातील व्याधी (Illness) पाहता, रोज तक्रारी वाढत चालल्या आहेत. अश्यातच बफेलो विद्यापीठातील (University Buffalo) संशोधकांच्या पथकाने कृत्रिम बुद्धिमत्तेची (Artificial intelligence) एक नवीन पद्धत विकसित केली आहे जी वयानुसार गंभीर आजारांच्या धोक्याचा अंदाज लावू शकते.

हे संशोधन 'जर्नल ऑफ फार्माकोकाइनेटिक्स अँड फार्माकोडायनामिक्स'मध्ये (Journal of Pharmacokinetics and Pharmacodynamics) प्रकाशित करण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये मेटाबोलिक (चयापचय) आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (धमनी आणि हृदय) बायोमार्कर वापरले जातील. हे मोजण्यासाठी जैविक प्रक्रियेद्वारे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी, बॉडी मास इंडेक्स, ग्लुकोज आणि रक्तदाब यांचे मूल्यांकन करून आरोग्याची स्थिती निश्चित केली जाईल. यासोबतच लोकांच्या पुढील आयुष्यात आजार होण्याची शक्यताही वैज्ञानिक आधारावर मोजली जाणार आहे.

या एआय मॉडेलद्वारे, व्यक्तीच्या वयानुसार पाचन आणि श्वसन रोगांच्या जोखमीचे मूल्यांकन केले जाईल. वयोमानानुसार शरीरात होणार्‍या बदलांचा पेशी, मानसिक स्थिती आणि वर्तणुकीच्या क्रियाकलापांवर विपरीत परिणाम होतो. फार्मास्युटिकल सायन्सचे (Pharmaceutical Science) प्रोफेसर मुरली रामनाथन (Murali Ramanathan) म्हणाले की, या माहितीमुळे आपण एखाद्या आजाराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो.

यासोबतच भविष्यातील रुग्णांना स्वत:चा बचाव करण्यासाठी पुरेसा वेळही मिळेल. अनेक क्लिनिकल थेरपींद्वारे, रुग्णांना त्या रोगाकडे जाण्यापासून रोखता येते. दीर्घकालीन क्रॉनिक ड्रग थेरपीचे मूल्यांकन करण्यासाठी देखील मॉडेलचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे डॉक्टरांना मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब यांसारख्या रोगांच्या उपचारांवर लक्ष ठेवण्यास देखील मदत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT