57 राष्ट्रांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; जागतिक आरोग्य संघटना

डब्ल्यूएचओने आपल्या साप्ताहिक महामारीविषयक अहवालात म्हटले आहे की, ओमिक्रॉन प्रकारामुळे होणाऱ्या रोगाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
Omicron variant
Omicron variantDainik Gomantak
Published on
Updated on

Omicron variant: ओमिक्रॉन प्रकार 57 राष्ट्रांमध्ये नोंदवला गेला आहे. त्याच्या वाढत्या प्रसाराबरोबर रुग्णालयात (Hospital) दाखल होण्याची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) (WHO) बुधवारी सांगितले.

Omicron variant
जर्मनीतील मर्केल युगाचा अंत, ओलाफ स्कोल्झ बनले नवे चान्सलर

डब्ल्यूएचओने आपल्या साप्ताहिक महामारीविषयक अहवालात म्हटले आहे की, ओमिक्रॉन प्रकारामुळे (Omicron Variant) होणाऱ्या रोगाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

26 नोव्हेंबर रोजी, डब्ल्यूएचओने ओमिक्रॉन प्रकार घोषित केला. कोरोनाचा (Corona) हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. दक्षिण आफ्रिकेत या प्रकारचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याच बरोबर झिम्बाब्वे, मोझांबिक, नामिबिया आणि लेसोथोमध्ये देखील कोरोना रुग्ण संखेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ओमिक्रॉनचा प्रसार व कमी लसीकरण दर या वाढत्या रुग्ण संख्येला कारणीभूत आहे, असे तज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com