Pinaka Rocket  
ग्लोबल

Armenia and India: 'पिनाका रॉकेट'साठी भारतासोबत आर्मेनियाची मोठी डील; पाकिस्तानचा मित्र अझरबैजानच्या वाढणार अडचणी

Armenia: मुस्लिम देश आणि पाकिस्तानचा मित्र अझरबैजान आणि भारताचा मित्र आर्मेनिया यांच्यात तणाव वाढला आहे.

Manish Jadhav

Armenia and India:

मुस्लिम देश आणि पाकिस्तानचा मित्र अझरबैजान आणि भारताचा मित्र आर्मेनिया यांच्यात तणाव वाढला आहे. अझरबैजानसोबत मोठ्या युद्धाच्या धोक्याचा सामना करत असलेल्या आर्मेनियाने धोकादायक पिनाका रॉकेटसाठी आपला मित्र भारतासोबत मोठा करार केला आहे. या करारामुळे अझरबैजानची अस्वस्थता वाढणार आहे.

आर्मेनियन मीडियानुसार, आर्मेनियन आर्मी भारताकडून पिनाकाची अपडेटेड आवृत्ती खरेदी करत आहे. यामुळे आर्मेनियन आर्मीला 40 ते 70 किमी अंतरावरील शत्रूचे कोणतेही ठिकाण नष्ट करण्याची ताकद मिळेल. या करारामुळे, आर्मेनियाने संकेत दिले आहेत की, ते रशियाने बनवलेल्या Grad BM 21 प्रणालीपासून दूर जात आहे. भारताची पिनाका रॉकेट यंत्रणा रशियन यंत्रणेपेक्षा खूप ॲडव्हान्स असून ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

पिनाका रॉकेट सिस्टिमची खासियत जाणून घ्या

पिनाका रॉकेट (Pinaka Rocket) सिस्टिममध्ये 6 रॉकेट लॉन्चर असतात. सोबतच लोडर व्हीकल देखील आहे जे रॉकेट पुन्हा लोड करुन हल्ल्यासाठी तयार करते. याशिवाय फायर कंट्रोल सिस्‍टम आणि हवामानाची माहिती देणारे रडारही आहे. अलीकडील व्हिडिओमध्ये पिनाका रॉकेटच्या कारखान्यातील अनेक पॉड दाखवण्यात आल्याने या करारासंबंधी खुलासा झाला.

तज्ज्ञांच्या मते, हे पॉड म्हणजे पिनाकाची आर्मेनियाला निर्यात करण्याची तयारी सुरु असल्याचे संकेत आहेत. पिनाका रॉकेट सिस्टिम भारतातील संरक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनी संयुक्तपणे बनवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार पिनाका रॉकेट यंत्रणा बनवण्याची तयारी सुरु आहे.

आर्मेनियाने भारताकडून ड्रोनविरोधी यंत्रणा खरेदी केली होती

भारत (India) आर्मेनियन सैन्याला सतत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करत आहे. यापूर्वी, अझरबैजानने अतिशय गुप्तपणे तुर्कीचे अकिंसी ड्रोन खरेदी केले होते. त्याचवेळी, 2022 मध्ये नागोर्नो काराबाखच्या युद्धादरम्यान अझरबैजानने तुर्की TB-2 ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. त्यामुळे आर्मेनियाचा पराभव झाला होता.

दरम्यान, अझरबैजानशी व्यवहार करण्यासाठी आर्मेनियाने (Armenia) भारताकडून ड्रोन किलर सिस्टिमही खरेदी केली आहे. युरोएशियन टाइम्सच्या वृत्तानुसार, आर्मेनियाने भारतात बनवलेली जेन अँटी-ड्रोन प्रणाली खरेदी केली आहे. भारतीय वायुसेनेने 2021 मध्ये ही अँटी-ड्रोन यंत्रणा देखील खरेदी केली होती. भारतीय हवाई दलाने ही यंत्रणा 2 अब्ज रुपयांना खरेदी केली. मार्च 2024 मध्ये ही यंत्रणा भारतीय हवाई दलात समाविष्ट केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT