Ghana Mining Dainik Gomantak
ग्लोबल

एपीएट: स्फोटात 13 ठार, घाना खाण क्षेत्रातील गाव नेस्तनाबूत

पश्चिम घानामधील सोन्याच्या खाणीत स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्फोट झाल्यामुळे 13 लोक ठार झाले तर 180 लोक जखमी..

दैनिक गोमन्तक

एपीएट: पश्चिम घानामधील सोन्याच्या खाणीत स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्फोट झाल्याने किमान 13 लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाले, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. राजधानी अक्रापासून सुमारे 200 किमी (130 मैल) पश्चिमेस असलेल्या अपिएटमध्ये जळणारी लाकडे, पडलेली घरे दिसली. गुरुवारी झालेल्या स्फोटामुळे सुमारे 20 मीटर (66 फूट) मोठे खड्डे पडले. घटनास्थळावरील सर्व घरे पडले तर काही घरांचे छप्पर उडून गेले आहेत.

Apiateमधील एका बाईस्टँडरने चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये दाखवले की, काही लोक रस्त्याच्या कडेला आगीच्या दिशेने चालत जात आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र पोलिसांनी सांगितले की, मोटारसायकल ट्रकवर आदळली आणि आग लागली. सरकार ने केलेल्या निवेदना नुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरला आग लागली.

पोलिसांनी सांगितले की, हा ट्रक मॅक्सम नावाच्या स्पॅनिश कंपनीच्या मालकीचा होता. आणि तो ट्रक टोरंटोस्थित किनरॉस गोल्ड कॉर्पोरेशनद्वारे चालवल्या जाणार्‍या चिरानो सोन्याच्या खाणीत स्फोटके घेऊन जात होता. तर भूमी आणि नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने म्हटले आहे की, घटनेच्या तपासाचा निकाल येईपर्यंत मॅक्सम कंपनीला खाणकामासाठी स्फोटकांचे उत्पादन, वाहतूक किंवा पुरवठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर जे (Ghana Mining) सेक्टरमध्ये स्फोटकांच्या वापरावर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार असलेले मुख्य निरीक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र 50 हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या 140 उपकंपन्या असलेल्या मॅक्समने यावर कोणतीही प्रतीक्रीया दिली नाही.

निर्वासीतांना केली मदत

सरकारने शुक्रवारी सांगितले की, मृतांची संख्या 17 होती, त्यात चुकून चार लोक मोजले गेले जे जिवंत आहेत. परंतु ते गंभीर स्थितीत आहेत. ही घटणा घडली तेव्हा जवळच्या शाळेतील शिक्षकांना प्रथम माहिती मिळाली आणि त्यांनी मुलांना बाहेर काढले. तेथील स्थानीक रहिवास्यांना बाहेर काढले. तसेच मृतांचा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो असेही सांगितले . घटनेच्या ठिकानी बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

बावडी आणि बोगोसो शहरांजवळील Apiate च्या भेटीत, उपाध्यक्ष महामुदु बावुमिया यांनी बचाव कार्य करणाऱ्यांचे कौतुक केले आणि सांगितले की, ज्यांनी आपली घरे गमावली त्यांच्यासाठी सरकार तात्पुरती घरे उभारण्याचे काम करत आहे. "सध्या आम्ही हे बचाव कार्य कसे पूर्ण करायचे याबद्दल खूप चिंतित आहोत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasmine Flower: 'जायांचे मळे वाचवायचेच'! ग्रामसभेत ठराव मंजूर; व्यावसायिक, निवासी प्रकल्पांना विरोध

Goa Politics: खरी कुजबुज; रवी नाईकांचे विनोद

Goa Crime: भरघोस व्याजाच्या आमिषाने दाम्पत्याला 16 लाखांचा गंडा, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Carambolim: 'गरीब अडचणीत येतील, गावाचा विनाश होईल'! करमळीत ‘मेगा प्रोजेक्ट’ला विरोध; ग्रामसभेत ठराव

Cyber Crime: ऑनलाईन गंडा; गोवेकरांचे 73 लाख पाण्‍यात! आर्थिक फसवणुकीच्‍या 903 घटना घडल्‍या

SCROLL FOR NEXT