Canada Dainik Gomantak
ग्लोबल

Canada: धक्कादायक! कॅनडातील राम मंदिरावर लिहिल्या भारताविरोधी घोषणा, भारतीय दुतावास म्हणाले...

कॅनडा येथील मिसिसॉगा येथील राम मंदिरावर भारताविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

कॅनडा येथील मिसिसॉगा येथील राम मंदिरावर भारताविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यापूर्वी येथील गौरी शंकर मंदिरावर देखील अशाच घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

टोरंटो येथील भारतीय दुतावासाने या घटनेच्या निषेध केला आहे. या सोबतच या घटनेचा तपास करण्यात यावा आणि दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात दूतावासाने ट्विट (Tweet) करत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मिसिसॉगा येथील राम मंदिरावर भारताविरोधी लिहिल्या घोषणांच्या घटनेची निंदा करत असून या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कॅनडाच्या (Canada) सरकारकडे केली आहे.''

भारताविरोधी घोषणा लिहिल्याची ही पहिलीच घटना नाही. या पूर्वी ब्रेम्पटन येथील एका हिंदू मंदिरावर देखील अशाच भारताविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय नागरिकांनी या घटनेचा निषेध केला होता.

येथील गौरी शंकर मंदिरात (Temple) तोडफोड करत भारत (India) विरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशी माहिती भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

भारतीय दूतावासाने बुधवारी ट्विट केले, या संदर्भात ट्विट करत लिहिण्यात आले होते की, या घटनेची आम्ही निंदा करत आहोत. ब्रेम्पटन येथील गौरी शंकर मंदिरात भारताविरोधी लिहिलेल्या घोषणांनाचा विरोध करतो. या घटनेमुळे कॅनडा येथे राहणाऱ्या भारतीयांच्या भावना या दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही येथील पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

येथील महापौर पैट्रिक ब्राऊन यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, अशा घटनांना आम्ही देशात स्थान देणार नाही. प्रत्येकाला देशात सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT