Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हल्ल्यात मारले गेले तरीही...

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग 12 व्या दिवशीही सुरुच आहे. दोन्ही देशातील तणाव वाढतच चालला आहे. याच पाश्भूमीवर अमेरिकेने युक्रेनच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (Anthony Blinken) यांनी म्हटले की, ''युक्रेनकडे एक योजना आहे, ज्यानुसार राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हल्ल्यात मारले गेले तरीही युक्रेनमधील (Ukraine) सध्याचे सरकार चालू राहील. म्हणजेच रशिया आपल्या मिशनमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. युक्रेन रशियाच्या (Russia) दबावापुढे झुकणार नाही.'' युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वारंवार दावा केला आहे की, 'रशिया मला मारण्याचा कट रचत आहे.' युक्रेनच्या म्हणण्यानुसार, सध्या रशियन सैन्य झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्या हत्येसाठी क्रेमलिनच्या आदेशाने कीववर धडक देत आहेत. (Anthony Blinken says the Ukraine government will continue even if Zelensky is killed in the attack)

युक्रेनच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी दावा केला

झेलेन्स्की यांच्या हत्येच्या भीतीबद्दल माध्यमाशी बोलताना ब्लिंकेन म्हणाले की, युक्रेन सरकारचे नेतृत्व कणखर आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलताना त्यांनी म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत देशात सरकारचे सातत्य सुनिश्चित करण्याची आम्ही एक योजना तयार केली आहे.'

झेलेन्स्की यांच्या हत्येचा वारंवार प्रयत्न

गेल्या आठवड्यात, युक्रेनियन अधिकार्‍यांनी सांगितले की, 'झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न वारंवार केला जात होता. मात्र आम्ही कथित कट हाणून पाडला आहे.' युक्रेनच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कीवला रशियाच्या प्रमुख सुरक्षा एजन्सी असणाऱ्या एफएसबीने हल्ल्याचा इशारा दिला होता.

रशिया सीरियन सैनिकांची तुकडी उतरवू शकतो: अमेरिका

दरम्यान, कीव काबीज करण्यासाठी रशिया सीरियन सैनिकांची तुकडी उतरवू शकते, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे. खरं तर या सीरियन लढाख्यांना शहरी भागात लढण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'रशियाकडून किती लढाखे पाठवले जातील हे अद्याप सांगण्यात आलेले नाही, मात्र अनेक सीरियन लढाखे युक्रेनमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT