First Republic Bank Dainik Gomantak
ग्लोबल

America: महासत्तेचा आर्थिक गोंधळ! अमेरिकेची आणखी एक बँक बुडाली, जेपी मॉर्गनने मालमत्तेचे केले अधिग्रहण

First Republic Bank: अमेरिकेतील आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. यातच, अमेरिकेची आणखी एक मोठी बँक 'फर्स्ट रिपब्लिक बँक' बुडाली आहे.

Manish Jadhav

First Republic Bank: अमेरिकेतील आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. यातच, अमेरिकेची आणखी एक मोठी बँक 'फर्स्ट रिपब्लिक बँक' बुडाली.

यूएस नियामकांनी या बँकेची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. त्याचबरोबर, जेपी मॉर्गन चेस बँकेने अडचणीत असलेली फर्स्ट रिपब्लिक बँक विकत घेतली आणि तिच्या सर्व ठेवी आणि मालमत्तेचे अधिग्रहण केले.

फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्प (FDIC) ने ही माहिती दिली आहे

दरम्यान, एफडीआयसीने सोमवारी सांगितले की, कॅलिफोर्नियाच्या नियामकांनी फर्स्ट रिपब्लिक बॅंक बंद केली आणि रिसीव्हर म्हणून नियुक्त केले. तर जेपी मॉर्गन चेस बॅंकने फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या (Bank) सर्व ठेवी आणि मालमत्तेचे अधिग्रहण केले.

दुसरीकडे, आठ यूएस राज्यांमधील 84 फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शाखा सोमवारी JPMorgan चेस बँकेच्या शाखा म्हणून पुन्हा उघडतील.

सॅन फ्रान्सिस्को-आधारित फर्स्ट रिपब्लिकला मार्चच्या सुरुवातीपासूनच वाईट काळांचा सामना करावा लागला होता. असे मानले जात होते की, बँक स्वतंत्र संस्था म्हणून जास्त काळ टिकू शकणार नाही.

तसेच, यूएस नियामकांच्या आपातकालीन हस्तक्षेपानंतर जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने अडचणीत असलेल्या बँकेचा ताबा घेतला आहे.

तत्पूर्वी, ठेवीदारांनी बँकेतून जास्त पैसे काढल्यामुळे बँक आपल्या ताळेबंदातील गोंधळ साफ करण्यात अपयशी ठरली.

तर या संपादनासह, JPMorgan फर्स्ट रिपब्लिकची मालमत्ता देखील संपादन करेल, ज्यामध्ये अंदाजे $173 अब्ज कर्ज (Loan) आणि $30 अब्ज सिक्युरिटीज आणि $92 अब्ज ठेवींचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT