Anju Nasrullah Love Story, Anju will return from Pakistan as she misses her children:
या वर्षी जुलैमध्ये आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेली अंजूला आता भारताची आठवण येत आहे. इस्लाम स्विकारल्यानंतर फातिमा बनलेल्या अंजूचा पती नसरुल्लाहने दावा केला आहे की अंजू तिच्या दोन मुलांना मिस करत आहे आणि ती मानसिकदृष्ट्या ठीक नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार अंजू पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये भारतात परतण्याची शक्यता आहे.
अंजू उर्फ फातिमा जुलै महिन्यापासून पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे राहत आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाहशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले होते.
वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या फोन मुलाखतीत अंजूचा पती नसरुल्लाहने उघड केले की त्यांची पत्नी 'मानसिकरित्या अस्वस्थ आहे. आणि ती आपल्या मुलांना खूप मिस करत आहे'.
नसरुल्लाह पुढे म्हणाले की, अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि ती आपल्या मुलांना खूप मिस करत आहे आणि तिच्याकडे परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
अंजूचे पती नसरुल्लाह यांनी अंजूच्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि भारतात परतणे तिच्यासाठी चांगले होईल असे सांगितले.
अंजूला दोन मुले आहेत, एक 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा. पाकिस्तानमध्ये आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंजू भारतात परतणार असल्याचे नसरुल्लाह यांनी सांगितले. व्हिसा मिळाल्यास अंजूसोबत भारतात येऊ शकतो, असेही त्याने सांगितले.
अंजू ही राजस्थानच्या भिवडी जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे आधीच लग्न झाले होते. 2019 मध्ये अंजूची फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नसरुल्लाहशी मैत्री झाली आणि हळूहळू तिचे रुपांतर प्रेमात झाले. तिने जुलैमध्ये नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात गेली होती तेव्हापासून ती तिथे राहत आहे.
अंजूने पती अरविंदला काही दिवसांसाठी जयपूरला जात असल्याचे खोटे सांगितले होते. मात्र, नंतर ती सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचे तिच्या पतीला मीडियाच्या माध्यमातून कळले.
गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये लग्नानंतर अंजू आणि नसरुल्ला पहिल्यांदा पेशावरला गेले होते. त्यांनी पेशावरमध्ये दिवंगत दिलीप कुमार यांसारख्या दिग्गज भारतीय चित्रपट अभिनेत्यांची वडिलोपार्जित घरे पाहिली होती. अंजू म्हणाली की मी काही पश्तो शब्द शिकली आहे. पाकिस्तानात येण्यापूर्वी मला माहित नव्हते की मी इथे इतकी प्रसिद्ध होईन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.