Afghanistan Hunger
Afghanistan Hunger Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: जगण्यासाठी पोटच्या मुलींसह, स्वत:ची किडनी, मूत्रपिंड विकताहेत अफगाणी नागरिक

Pramod Yadav

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अभूतपूर्व भुकेचं संकट निर्माण झाले आहे. देशात तालिबानी राजवट लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले असून, संपूर्ण देश उपासमारीचा समाना करत आहे. लहान मुलांची भूक भागवण्यासाठी त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन झोपवले जात आहे. तालिबान राजवटीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना मदत मिळत नाही. देशात उपासमार आणि बेरोजगारी इतकी पसरली आहे की लोक जगण्यासाठी पोटच्या मुलींसह, स्वत:ची किडनी, मूत्रपिंड विकताहेत.

अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. देशात बेरोजगारी वाढत असून लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. भुकेच्या संकटामुळे लोक हतबल झाले आहेत. भूक लागल्यावर येथील लोक पाव किंवा झोपेच्या गोळ्या खात आहेत. मुलांची भूक भागवण्याचेही साधन त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने मुलांना गुंगीच्या गोळ्या खाऊ घालत आहेत.

15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आले. त्या दिवसापासून देश विविध संकटांचा सामना करत आहेत. देशातील गरीबी आणि उपासमार यामुळे लोक त्यांच्या लहान मुलींची लग्न लावून देत आहेत, जेणेकरून त्यांचा उपासमारीपासून बचाव होईल. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमानुसार, अफगाणिस्तानच्या 95 टक्के लोकसंख्येकडे खायला पुरेसे अन्न नाही. या देशात पाच वर्षांखालील 10 लाखांहून अधिक मुले कुपोषणाची शिकार झाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT