American Singer Mary Milbane Congratulated India on its 77th Independence Day Along With special video. Dainik Gomantak
ग्लोबल

Independence Day: अमेरिकन गायिकेने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; शेअर केला खास व्हिडिओ

Mary Milbane: यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये पंतप्रधान मोदींसोबत स्टेजवर राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. यासोबतच स्वातंत्र्य हे केवळ स्मृती नसून भविष्याला दिशा देणारे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashutosh Masgaunde

American Singer Mary Milbane Congratulated India on its 77th Independence Day Along With Special Video:

अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या 'जन-गण-मन' गाताना दिसत आहे. तसेच 14 ऑगस्ट रोजी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून एक खास संदेशही पाठवला होता.

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मेरी मिलबेनने यांनी सोशल मीडिया अकाउंट X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या पंतप्रधान मोदींसोबत दिसत आहे.

त्यासोबत त्यांनी लिहिले, "हा स्वातंत्र्याचा आवाज आहे. भारत, एक राष्ट्र आहे ज्याने विविध संस्कृती, भाषा आणि परंपरांनी आणि सभ्यता शतकानुशतके आकार घेतली आहे. आज भारत स्वातंत्र्याच्या झेंड्याखाली एकसंध उभा आहे. भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, 'जय हिंद'."

गायिका मेरी मिलबेन यांनी भारतीयांना विविधतेत एकता स्वीकारण्याचे आवाहन केले आहे, एकजुटीची शक्ती साजरी करावी आणि प्रत्येकामध्ये असलेल्या सामर्थ्याचा उपयोग करावा. त्यांनी भारतीय ध्वजाच्या तीन रंगांचे महत्त्व सांगितले.

मेरी मिलबेन म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही तुमचा तिरंगा (Tiranga) ध्वज फडकवता तेव्हा त्याचा भगवा रंग धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे, पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग विकास आणि विपुलतेचे प्रतीक आहे.

गायिका मेरी मिलबेनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या समारोप समारंभात परफॉर्म केले होते. यावेळी त्यांनी भारताचे कौतुकही केले होते. एवढेच नाही तर अलीकडेच त्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या (No Confidence Motion) मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींचे समर्थनही केले होते.

कोणतेही तथ्य नसताना विरोधक जोरदार घोषणाबाजी करतात आणि सत्य नेहमीच लोकांना मुक्त करते यावर त्यांनी भर दिला. मिलबेन म्हणाल्या की, माझा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT