Plane Crash Oak Island Dainik Gomantak
ग्लोबल

America Plane Crash: अमेरिकेत पुन्हा विमान अपघात! नॉर्थ कॅरोलिनाजवळ विमान समुद्रात कोसळले; वैमानिक थोडक्यात बचावला

Plane Crash Oak Island: अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडली. नॉर्थ कॅरोलिना राज्यातील ओक आयलंडजवळ एका छोटे विमान समुद्रात (Sea) कोसळले.

Manish Jadhav

America Plane Crash: अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडली. नॉर्थ कॅरोलिना राज्यातील ओक आयलंडजवळ एका विमान समुद्रात (Sea) कोसळले. शनिवारी (2 ऑगस्ट) संध्याकाळी ही घटना घडली. सुदैवाने, या अपघातात फक्त वैमानिक (Pilot) जखमी झाला असून, त्याला वाचवण्यात यश आले.

नेमके काय घडले?

  • अपघाताची वेळ आणि ठिकाण: शनिवार संध्याकाळी लोक किनाऱ्यावर फिरत असताना हा अपघात (Accident) झाला. एक इंजिन असलेले छोटे विमान अचानक समुद्रात कोसळले.

  • वैमानिकाची सुटका: विमान समुद्रात पडल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरु करण्यात आले. यात वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्याला किरकोळ दुखापती झाल्या असून, जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात केवळ वैमानिकच होता.

  • चौकशीचे आदेश: फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या घटनेच्या कारणांची तपासणी करत आहे. तांत्रिक बिघाडामुळे (Technical fault) हा अपघात झाला की आणखी काही कारण होते, याचा शोध घेतला जात आहे.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

दरम्यान, या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान ज्या पद्धतीने खाली आले, ते पाहता असे वाटत होते की वैमानिक समुद्रात लँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा अपघात पाहून किनाऱ्यावरील लोकांमध्ये घबराट पसरली.

अमेरिकेतील मागील काही विमान अपघात

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत असे अनेक विमान अपघात झाले आहेत:

  • जानेवारी 2025: रीगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळाजवळ (Reagan Washington National Airport) एका ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची आणि एका प्रवासी विमानाची हवेत टक्कर झाली, ज्यात 67 लोकांचा मृत्यू झाला.

  • जानेवारी 2025: फिलाडेल्फिया येथे एअर ॲम्ब्युलन्सच्या (Air Ambulance) अपघातात 8 लोकांचा मृत्यू झाला.

  • एप्रिल 2025: न्यूजर्सीमध्ये एक हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले, यात 5 लोकांचा मृत्यू झाला होता.

  • मे 2025: सॅन डिएगो येथे लष्कराच्या विमानाला अपघात झाला, यात 6 लोकांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT