FBI Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेतील शीख नेत्यांना एफबीआयकडून अलर्ट! हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर...

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंग निज्जर यांच्या मृत्यूबाबत भारताविरोधात टिप्पणी केली, त्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले.

Manish Jadhav

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar: कॅनडातील सरे येथे काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची (Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंग निज्जर याच्या मृत्यूबाबत भारताविरोधात टिप्पणी केली, त्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले.

यातच आता, अमेरिकन तपास संस्था एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) ने अमेरिकास्थित (America) असलेल्या अनेक शीख नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना इशारा दिला की त्यांच्या जीवालाही धोका आहे.

एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी शीख नेत्यांची भेट घेतली

अमेरिकन शीख कॉकस कमिटीचे समन्वयक आणि राजकीय कार्यकर्ते प्रीतपाल सिंग यांनी सांगितले की, ते आणि इतर दोन अमेरिकन शीख नेत्यांनी एफबीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली.

कॅलिफोर्निया स्थित गैर-लाभकारी ग्रुप, Ensaaf चे सह-संचालक सुखमन धामी यांनी सांगितले की, अमेरिकेतील शीख नेत्यांना एफबीआयकडून संभाव्य धोक्यांबद्दल चेतावणी प्राप्त झाली आहे.

जस्टिन ट्रुडो यांचे भारताविरोधात वक्तव्य

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाचा (Canada) नागरिक आणि शीख फुटीरतावादी नेता निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले. निज्जरला 2020 मध्ये भारताने दहशतवादी घोषित केले होते. यातच, भारताने कॅनडा सरकारचे दावे फेटाळून लावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT