America Dainik Gomantak
ग्लोबल

America: जॉर्जियामधील एका हाऊस पार्टीत बेछूट गोळीबार; 2 मुलांचा मृत्यू तर 6 जखमी

जॉर्जियातील डग्लसविले येथील एका घरात झालेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील  जॉर्जियामध्ये एका हाऊस पार्टी गोळीबार झाला. जॉर्जिया येथील डग्लसविले येथील घरामध्ये झालेल्या गोळीबारात दोन किशोर ठार झाले तर सहा जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. 

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही मृतांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्टीमध्ये 100 हून अधिक मुल जमले होते. 

मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गोळीबाराच्या घटनेत किती लोक सामील होते हे स्पष्ट झालेले नाही. या सर्व बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. डग्लस काउंटी शेरीफ कार्यालयाचे अधिकारी ट्रेंट विल्सन यांनी वृत्तसंस्था एपीला सांगितले की, शनिवारी रात्री 10:30 ते 11:30 च्या दरम्यान गोळीबार झाला. घराच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या मुलीच्या 16 व्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित केली होती.

या पार्टीला 100 हून अधिक मित्रांनी हजेरी लावली होती. यादरम्यान काही लोक गांजा ओढू लागले, त्यानंतर त्यांनी रात्री 10 वाजता पार्टी संपवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान गोळीबार सुरू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. शूटिंगच्या वेळी प्रौढ व्यक्ती उपस्थित होती की नाही हे स्पष्ट नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT