Eileen Wang  Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेत महापौरपदी 'चीनी एजंट'! 'US News Center' च्या नावाखाली चालवला प्रोपगंडा; ईलीन वांगला होणार 10 वर्षांची शिक्षा?

Eileen Wang Plea Deal Los Angeles Court: अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था FBI ने कॅलिफोर्नियातील आर्केडिया शहराच्या महापौर ईलीन वांग यांच्यावर चीनसाठी 'एजंट' म्हणून काम केल्याचा खळबळजनक आरोप केला.

Manish Jadhav

Eileen Wang China Propaganda Charges: अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था FBI ने कॅलिफोर्नियातील आर्केडिया शहराच्या महापौर ईलीन वांग यांच्यावर चीनसाठी 'एजंट' म्हणून काम केल्याचा खळबळजनक आरोप केला. न्यायालयात वांग यांच्याविरुद्ध यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे अमेरिकन प्रशासनात मोठी खळबळ उडाली.

FBI च्या तपासानुसार, 58 वर्षीय ईलीन वांग यांनी 2020 ते 2022 या काळात चीन सरकारच्या अधिकाऱ्यांच्या थेट सूचनेनुसार काम केले. यादरम्यान त्यांनी अमेरिकेमध्ये चीनच्या हितसंबंधांना चालना देण्यासाठी आणि कम्युनिस्ट राजवटीच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्याचे समोर आले.

या कारस्थानामध्ये ईलीन वांग यांनी याओनिंग 'माइक' सन नावाच्या व्यक्तीच्या मदतीने अमेरिकेतील चिनी-अमेरिकन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणावर 'प्रोपगंडा' म्हणजेच चुकीचा प्रचार करण्याचे काम केले. यासाठी त्यांनी 'US News Center' नावाच्या एका वेबसाइटचा वापर केला. ही वेबसाइट स्थानिक समुदायासाठी एक विश्वासार्ह 'न्यूज प्लॅटफॉर्म' असल्याचे भासवत चिनी सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेले लेख आणि मजकूर तिथे प्रसिद्ध केला जात असे. तपासात असे उघड झाले की, जून 2021 मध्ये चीनच्या एका सरकारी अधिकाऱ्याने 'वीचॅट' (WeChat) ॲपद्वारे वांग यांना आधीच तयार केलेले लेख पाठवले होते, जे अमेरिकेतील चिनी समुदायात प्रसारित करण्याचे उद्दिष्ट होते.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ईलीन वांग यांनी स्वतःवर करण्यात आलेले आरोप मान्य केले आहेत. या गुन्ह्यासाठी त्यांना जास्तीत जास्त 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अमेरिकन न्याय विभागाच्या माहितीनुसार, वांग सोमवारी लॉस एंजेलिस येथील जिल्हा न्यायालयात हजर राहून अधिकृतपणे आपला गुन्हा कबूल करु शकतात. विशेष म्हणजे, वांग नोव्हेंबर 2022 मध्ये आर्केडिया सिटी कौन्सिलवर निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर रोटेशननुसार त्या महापौर बनल्या होत्या. चीनची (China) एजंट म्हणून नाव समोर येताच त्यांनी आपल्या पदाचा आणि सिटी कौन्सिल सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा दिला.

अमेरिकेच्या (America) राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणाचे सहाय्यक ॲटर्नी जनरल जॉन आइजनबर्ग यांनी यावर चिंता व्यक्त करताना सांगितले की, परकीय सरकारच्या तालावर नाचणारी व्यक्ती सार्वजनिक आणि महत्त्वाच्या पदावर पोहोचणे हे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे. कॅलिफोर्नियाचे सहाय्यक ॲटर्नी बिल इसायली यांनी स्पष्ट केले की, जे लोक गुप्तपणे परकीय सरकारांसाठी काम करतात, ते अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांविरुद्ध केलेली ही कारवाई चीनच्या भ्रष्ट प्रभावाविरुद्ध मिळालेले एक मोठे यश आहे. FBI ने या प्रकरणाद्वारे अशा सर्व लोकांसाठी कडक इशारा दिला, जे परकीय सत्तेच्या मदतीने अमेरिकेच्या अंतर्गत घडामोडींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vish Yog 2026: ग्रहांच्या महायुतीनं बनला 'विष योग'! 3 राशींच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार; शनीची चाल बदलणार नशीब

Viral Video: 'दोरी ओलांडली अन् भारतात घुसले'; पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचा अजब दावा, नेटकऱ्यांनी काढली चांगलीच खोड

Tar River Pollution: तार नदीचे अस्तित्व धोक्यात: वाढत्या प्रदूषणामुळे नदीची अवस्था बिकट VIDEO

Virat Kohli Lizlaz Controversy: "विराटची बदनामी करण्यासाठी मला पैशांचं आमिष दाखवलं" जर्मन मॉडेलचा खळबळजनक खुलासा

डिचोलीत शुक्रवारी ‘शिंदेसेने’चा मेळावा रणनीती ठरणार: महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT