Bangladesh Crisis Social Media
ग्लोबल

बांगलादेश हिंसाचार! सोशल मिडियावर 'ऑल आईज ऑन हिंदूज' हॅशटॅग ट्रेंड

Bangladesh Crisis: हा केवळ सोशल मिडिया हॅश टॅग नसून तो बांगलादेशातील हिंदू सहन करत असलेल्या हिंसाचाराच्या झळा आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

विद्यार्थी आंदोलनाने हिंसळ वळण घेतल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हासिना यांनी राजीनामा देत देश सोडला. हासिना यांच्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्याकडे आंतरिम सरकारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण, युनूस यांच्याकडे सूत्रे सोपविल्यानंतर देखील बांगलादेशमधील हिंसाचार कमी झाल्याचे दिसत नाही. देशात हिंदूंना लक्ष करत हिंसाचार सुरुच आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमातून समोर येणाऱ्या विविध वृत्तांनुसार, बांगलादेशची राजधानी ढाका येथे हिंसाचारात हिंदूंना लक्ष केलं जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ऑल आईज ऑन हिंदू इन बांगलादेश हा हॅश टॅग सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

गाजा येथील वादानंतर ऑल आईज ऑन राफा हॅश टॅग व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ऑल आईज ऑन हिंदू चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, हा केवळ सोशल मिडिया हॅश टॅग नसून तो बांगलादेशातील हिंदू सहन करत असलेल्या हिंसाचाराच्या झळा आहेत. तसेच, या हिंसाचाराला इस्लामी गट खतपाणी घालत असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून प्रकट होत आहेत.

१९७१ च्या युद्धात सहभागी कुटुंबियांना सरकारी नोकरीत ३० टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, या कोटा पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले.

विद्यार्थी आंदोलन म्हणून सुरु झालेल्या या आंदोलनात राजकारणाने प्रवेश केला. राजकीय पक्षानी विद्यार्थी आंदोलन हायजॅक करुन हिंसाचाराला प्रोत्साहन दिले. दिवसेंदिवस हिंसक होत गेलेल्या या आंदोलनामुळे तत्कालिन पंतप्रधान शेख हासिना यांना देश सोडून भारतात राजाश्रय घ्यावा लागला.

अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर देखील बांगलादेशात हिंसाचार सुरुच आहे. हिंदू विरोधात होत असलेल्या अत्याचाराविरोधात आत्तापर्यंत कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात रॅली काढण्यात आल्या. बांगलादेशमध्ये हिंदूच्या रक्षणासाठी सोशल मिडियावर सेव्ह हिंदू इन बांगलादेश कॅम्पेन जोर धरु लागले आहे.

देशात २०० ठिकाणंवार हिंसक घटना समोर आल्या आहेत. ५२ जिल्ह्यात हिंदू लोकांविरोधात हिंसक घटना घडल्या आहेत. निष्पाप नागरिकांची घरे जाळण्यात आली तर काही ठिकाणी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. देशातील अल्पसंख्याक लोकांचे रक्षण करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय स्तरावरुन बांगलादेशच्या आंतरिम सरकारला करण्यात आले आहे.

हिंदू लोकांनी देखील रस्त्यावर उतरत संरक्षणाची मागणी केलीय. बांगलादेश त्यांची मातृभूमी असून, ते तिथून कोठेही जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात लाखो हिंदू लोकांची पाकिस्तान सैनिकांनी कत्तल केली होती.

बांगलादेशमध्ये सुरु असणारा हिंसाचार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. हिंदू विरोधात सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत भारताकडून देखील बांगलादेशला सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT